आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोना व्हॅक्सीनेशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी Co-Win पोर्टलवर जवळपास 25 लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. यामध्ये 24.5 लाख सामान्य लोक आणि इतर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, देशात 16 जानेवारीला सुरु झालेल्या व्हॅक्सीनेशनच्या 45 व्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 4 लाख 27 हजार 72 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 3 लाख 25 हजार 485 लोकांना पहिला डोज आणि एक लाख एक हजार 587आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोज देण्यात आला.
1.47 कोटी कोरोनाचे डोज देण्यात आले
आरोग्य मंत्रालयाच्या प्रोविजनल रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एक लाख 28 हजार 430 लोकांना कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोज देण्यातआला. गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 18,850 लोकांनाही लस देण्यात आली. ओव्हरऑल देशात आतापर्यंत 1.47कोटी कोरोना डोज देण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या टप्प्यामध्ये 27 कोटी लोकांना लस देण्यात येईल
दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाईलल. यासोबतच 45 ते 60 वर्ष वयाच्या अशा लोकांनाही व्हॅक्सीन दिली जाईल, जे गंभीर आजारांचा समाना करत आहेत. केंद्र सरकारचा असा अंदाज आहे की सुमारे 27 कोटी लोक या वर्गवारीत येतात.
24 हजार ठिकाणांवर लसीकरण
लोक त्यांच्या घराजवळील केंद्रावर अपॉईंटमेंट घेण्यास सक्षम असतील. सध्या लसीकरण केवळ सरकारी रुग्णालये व आरोग्य केंद्रांवर होत आहे. हे सुमारे 12 हजार आहेत. येथे आयुष्मान भारत एम्पेनेल्ड हॉस्पिटल्स किंवा CGHS हॉस्पिटल देखील असतील, जे 12,000 आहेत. अशा प्रकारे एकूण 24 हजार ठिकाणांवर लसीकरण होणार आहे.
कोविन अॅपवर कोणतीही नोंदणी होणार नाही
कोरोना अॅपवर कोरोना लस घेण्यासाठी पहिल्या दिवशी नोंदणीच्या अडचणी उद्भवल्यानंतर, आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की को-विन अॅपऐवजी वेबसाइटवरच लसीकरणासाठी अपॉईंटमेंट घ्या. मंत्रालयाने म्हटले आहे की कोविन अॅप केवळ कोविड -19 लसच्या प्रशासनाशी संबंधित आहे. नोंदणी व भेटीसाठी नाही. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की आपल्याला लसीकरणासाठी नोंदणी करावी लागेल आणि अपॉईंटमेंट घ्यायचे असेल तर http://COin.gov.in वर जा.
पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी घेतली लस
दुसर्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपींना लसी देण्यात आली. मोदी पहाटेच दिल्ली एम्स येथे दाखल झाले आणि त्यांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लस देण्यात आली. त्याचवेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही या लसीचा पहिला डोस दिला. आता 28 दिवसानंतर त्यांना लसचा दुसरा डोस दिला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.