आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Corona Vaccination Registration | Corona Vaccination Registration For 18 Plus, Appointments At State Govt Centers & Private Centers Depending On How Many Vaccination Centers Are Ready On 1st May For Vaccination Of 18 Plus

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18+ कोरोना व्हॅक्सीन रजिस्ट्रेशन सुरू:कोविन पोर्टलचे सर्व्हर झाले क्रॅश, लोक त्रस्त; अपॉइंटमेंट न घेता 18+ वयाचे लोक घेऊ शकणार नाहीत कोरोना व्हॅक्सीन

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 18+ वयोगटातील लोकांना लस घ्यायची आहे त्यांच्यासाठी नोंदणी बुधवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू होईल.

देशात 18 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण एक मेपासून सुरू होणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन आजपासून म्हणजेच 28 एप्रिल संध्याकाळी 4 वाजेपासून सुरू होणार होते. मात्र 4 वाजताच कोविन पोर्टल क्रॅश झाले. लोकांना आरोग्य सेतु आणि उमंग अॅपवरही अशाच समस्येचा सामना करावा लागला. खरेतर 18 ते 44 वर्षांचे लोक रजिस्ट्रेशन न करता लस घेऊ शकणार नाहीत. दरम्यान आता पोर्टल क्रॅश झाल्याने लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

यापूर्वी सरकारने रजिस्ट्रेशनसाठी तारीख घोषित केली. मात्र कोणत्या वेळी रजिस्ट्रेशन सुरू होईल? याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. अशा वेळी लोकांनी 27 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपासूनच कोविन पोर्टल, आरोग्य सेतु किंवा उमंग अॅपवर रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रक्रिया सुरू झाली नाही तेव्हा लोक सोशल मीडियावर तक्रारही करताना दिसले. यानंतर सरकारने आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून परिस्थितीची माहिती दिली.

त्यानुसार, ज्या 18+ वयोगटातील लोकांना लस घ्यायची आहे त्यांच्यासाठी नोंदणी बुधवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू होईल. अशा लोकांना केवळ खासगी आणि राज्य सरकारच्या केंद्रांच्या उपलब्धतेच्या आधारे अपॉइंटमेंट मिळेल. म्हणजेच, 1 मे रोजी लसीकरणासाठी तयार असलेल्या केंद्रांच्या आधारेच लोकांना अपॉइंटमेंट दिली जाईल.

वेळ उशीरा जाहीर केल्याने लोकांमध्ये नाराजी
आरोग्य सेतूच्या ट्विटर हँडलवरून सकाळी 7.50 ते संध्याकाळी 4 या वेळेत नोंदणी जाहीर करण्यात आली. म्हणूनच पहिल्यापासूनच नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की सरकारने पहिलेच वेळ जाहीर करायला हवा होता. 27 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून लोक नोंदणी करण्याचा प्रयत्न करत होते.

18+ चे लसीकरण करण्यावर राजकारण का होतेय?

 • अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देशातील 18+ लोकसंख्येला लसी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण ते खूप गुंतागुंतीचे आहे. धोरणानुसार कसौलीच्या केंद्रीय औषधी प्रयोगशाळेची मंजुरी मिळाल्यानंतर 50% डोस केंद्राकडे जातील आणि उर्वरित डोस राज्ये व खासगी रुग्णालयात वितरीत केले जातील.
 • कोविशील्डसाठी सीरम इन्स्टिट्यूट व कोवाक्सिनसाठी भारत बायोटेककडून 150 रुपये प्रति डोस देण्याचा केंद्र सरकारने करार केला आहे. राज्यांसाठी कोवशील्डचा एक डोस 400 रुपये असेल तर कोवाक्सिनचा एक डोस 600 रुपये असेल. कंपन्यांनी ही किंमत निश्चित केली आहे.
 • आता याबद्दल बरेच प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे सध्या कोणाकडेही नाहीत. उदाहरणार्थ, केंद्र आणि राज्य सरकारांच्या किंमती वेगवेगळ्या का आहेत? केंद्र सरकार स्वतःच खरेदी करून लस डोस राज्यांना का देत नाही? राज्ये आणि खासगी रुग्णालयांना मिळणाऱ्या लसी डोसचे वितरण कसे केले जाईल?
 • यावरही राजकारण तापले आहे. राजस्थान, झारखंड, पंजाब आणि छत्तीसगडच्या आरोग्य मंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि म्हटले आहे की केंद्र त्यांना सावत्र वागणूक देत आहे. जेव्हा त्यांनी सीरम इन्स्टिट्यूटकडून डोस मागितला, तेव्हा उत्तर मिळाले की 15 मेपूर्वी ते शक्य होणार नाही. आता ही राज्ये म्हणत आहेत की ते बजेटमध्ये नसले तरी ते पैसे काही प्रमाणात जुळवून घेऊ पण जर त्यांना लस डोस मिळाला नाही तर मग ते 18+ लोकांचे लसीकरण कसे होईल?

कोविड-19 व्हॅक्सीन घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?
रजिस्ट्रेशन केल्याशिवाय मिळणार नाही लस
तुम्ही पहिलेच रजिस्ट्रेशन करुन अपॉइंटमेंट बुक करु शकता. यासाठी कोरोना व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क (Co-Win)प्लॅटफॉर्म बनवला आहे. या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर व्हॅक्सीनेशनसंबंधीत प्रत्येक डेटा उपलब्ध असेल. काही सेंटर्सवर वॉक-इन सुविधाही असेल.

रजिस्ट्रेशन कसे होईल?
आरोग्य सेतु अॅप्लिकेशन आणि कोविन वेबसाइट (cowin.gov.in) वर रजिस्ट्रेशन होत आहे. यासाठी तुम्हाला हे करावे लागेल -

 • मोबाइल नंबरला OTP ने व्हेरिफाय करावे लागेल.
 • आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणत्याही इतर फोटो ओळख पत्राच्या आधारावर आपली माहिती सबमिट करावी लागेल.
 • पिनकोड इत्यादी टाकून व्हॅक्सीनेशन साइट, तारीख आणि वेळ निवडावी लागेल.
 • एका मोबाइल नंबरवरुन जास्तीत जास्त चार लोकांचे रजिस्ट्रेशन होऊ शकेल.

वॉक-इनची सुविधा कुठे मिळेल?
सरकारी आणि प्रायव्हेट व्हॅक्सीनेशन सेंटर्सवर वॉक-इनची सुविधा आहे. कोणतीही व्यक्ती आपला फोटो ओळखपत्र देऊन ऑन-द-स्पॉट रजिस्ट्रेशन करुन व्हॅक्सीन डोज घेऊन शकते. मात्र यासाठी तुम्हाला ज्या सेंटरवर जायचे आहे तिथली स्थिती जाणून घ्या.

बातम्या आणखी आहेत...