आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccination State Wise List Updates Till March 10; Gujarat Maharashtra Madhya Pradesh Haryana Chhattisgarh Jharkhand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना लसीकरण:पुन्हा खाली आला 24 तासात डोज घेणाऱ्यांचा आकडा; केवळ 13 लाख डोज देण्यात आले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या डेटानुसार भारतामध्ये आतापर्यंत 2.43 कोटी डोज देण्यात आले आहेत.

भारतात सोमवारी कोरोनाविरोधात लसीकरण डोजने 20 लाखांचा आकडा पार केला आणि दुसऱ्याच दिवशी 35% कमी झाला. मंगळवारी 13.59 लाख डोज देण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या डेटानुसार भारतामध्ये आतापर्यंत 2.43 कोटी डोज देण्यात आले आहेत. यामध्ये 2 कोटी पहिले डोज आणि 43 लाख दुसऱ्या डोजचा समावेश आहे. लसीचा डोज देण्याच्या बाबतीत राजस्थान सर्वात पुढे आहे. येथे जवळपास 24 लाख डोज देण्यात आले आहेत. यानंतर गुजरात (21 लाख) आणि महाराष्ट्र (20 लाख) चा नंबर लागतो.

16 जानेवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 1.43 कोटी लोकांना लस देण्यात आली होती. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यातच 50 लाखांपेक्षा जास्त डोज देण्यात आले. म्हणजेच प्रत्येक दिवशी जवळपास 7.5 लाखांपेक्षा जास्त डोज देण्यात आले आहेत. देशात 16 जानेवारीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासोबतच लसीकरणाची सुरुवात झाली होती. 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सलाही लस देण्यात आली होती. 13 फेब्रुवारीपासून हेल्थकेअर वर्कर्सला दुसरा डोज देण्यात येत आहे. फ्रंटलाइन वर्कर्सला दुसरा डोज देण्याची सुरुवात 2 मार्चला झाली. 1 मार्चपासून सरकारने सीनियर सिटीजन आणि 45-59 वर्षांच्या गंभीर आजाराचा सामना करत असलेल्या लोकांना लसीकरणात सामिल करण्यात आले. यासोबतच खासगी रुग्णालयांनाही लस देण्यासाठी अधिकृत केले. यानंतरपासून आकड्यांमध्ये वाढ होत आहे.

बातम्या आणखी आहेत...