आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccination The Advance Of Rajasthan, Bihar, Gujarat; Chandigarh Lags Behind

व्हॅक्सिन अपडेट:राजस्थान, बिहार, गुजरात यांची आगेकूच; चंदीगड सर्वात मागे; देशात 23 दिवसांत 60% हेल्थ वर्कर्सना डोस

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील एकूण ९६.२५ लाख हेल्थ वर्कर्सपैकी ५८.१२ लाख जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, ते उद्दिष्टाच्या ६०.४% आहे. राजस्थान, बिहार व गुजरात उद्दिष्टाच्या जवळ पोहोचले आहेत, तर चंदीगड, दिल्लीसह १० राज्ये खूप मागे आहेत. केंद्र सरकारने राज्यांना २० फेब्रुवारीपर्यंत सर्व हेल्थ वर्कर्सना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्या हिशेबाने देशातील उर्वरित ३८.१२ लाख हेल्थ वर्कर्सना १३ दिवसांत (८ फेब्रुवारीसह) डोस द्यावा लागेल, म्हणजे रोज २.९३ लाख डोस. तथापि, आता रोज डोस घेणाऱ्यांची सरासरी संख्याही २.९० लाखांवर गेली आहे, त्या दृष्टीने उद्दिष्ट सोपे वाटत आहे. पण चंदीगड, पंजाब व तामिळनाडूसारख्या राज्यांत आतापर्यंत एकतृतीयांश हेल्थ वर्कर्सनाच डोस दिला आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अत्यंत कठीण दिसत आहे.

आता हेही एक आव्हान : २ कोटी फ्रंटलाइन वर्कर्सपैकी ८६.२८ लाखांनीच केली नोंदणी
केंद्र सरकारने ६ मार्चपर्यंत देशातील सर्व २ कोटी फ्रंटलाइन वर्कर्सच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ११ राज्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यास सुरुवातही झाली आहे. ८ फेब्रुवारीच्या सायं. ६ वाजेपर्यंत देशात ६ लाख फ्रंटलाइन वर्कर्सना लस टोचण्यात आली होती. देशातील अर्ध्यापेक्षा जास्त फ्रंटलाइन वर्कर्सनी लसीकरणासाठी अद्याप नोंदणी केलेली नाही, हे आव्हान आहे. ८६.२८ लाख फ्रंटलाइन वर्कर्सनी नोंदणी केली आहे. यामुळे केंद्राने राज्यांना सांगितले आहे की, नोंदणीचा वेग वाढवण्यात यावा. प्रत्येक फ्रंटलाइन वर्करला ६ मार्चपर्यंत कोणत्याही स्थितीत लस दिली जावी.

बातम्या आणखी आहेत...