आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccination The First Dose Will Be Given To 70% Of Adults In 7 States Of The Country By August

लसीकरण:देशातील 7 राज्यांत ऑगस्टपर्यंत 70% प्रौढांना दिला जाईल पहिला डोस, दोन्ही डोस देण्यात अजूनही केरळच आघाडीवर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरातमध्ये सर्वाधिक 43% प्रौढांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला गेला, बिहार-उप्र सर्वात मागे

देशातील ७०% प्रौढांच्या (१८+) लसीकरणाचे उद्दिष्ट आता स्पष्ट हाेताना दिसत आहे. २१ जूननंतर लसीकरणाची गती वाढल्याने ७ राज्ये अशी पुढे आलीत की तेथे ऑगस्टपर्यंत ७० टक्के प्रौढांना लसीचा पहिला डोस दिला जाईल. यासाठी लसीकरणाची गती अशीच राहणे गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते देशात ९४ कोटी लोकसंख्या १८+ लोकांची आहे. यात २७.८७ कोटी (२९.६५%) लोकांनी पहिला डोस घेतला आहे. राज्यांचे प्रमाण लक्षात घेतले तर गुजरातेत सर्वाधिक ४३% प्रौढांना एक डोस मिळाला. त्यानंतर राजस्थान, दिल्ली, केरळ व हरियाणा आघाडीवर आहेत. २१ जूनपूर्वी केरळ आघाडीवर होते. आता चौथ्या स्थानावर तर उप्र आणि बिहार सर्वात मागे आहेत.

तज्ज्ञांच्या मते ७०% लोकांना पहिला डोस दिल्यानंतर त्यांना पुढील तीन महिन्यांत दुसरा डोस दिला गेल्यास त्यांच्यात हर्ड इम्युनिटी दिसून येते. ७०% लोकांना डोस मिळाल्यानंतर हर्ड इम्युनिटीचा स्तर मिळतो. हर्ड इम्युनिटी आल्यास संक्रमणाचा प्रसार थांबतो. डब्ल्यूएचओच्या मते हर्ड इम्युनिटी आल्यानंतर कोरोनाच्या अंताला सुरुवात होईल.

बातम्या आणखी आहेत...