आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccinations Have Dropped By 32% In The Last 7 Days, With Little Hope Of Speeding Up

लसीकरण:गेल्या 7 दिवसांत 32% घटले कोरोना लसीकरण, वेग वाढण्याची आशा कमीच

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यांना या महिन्यात 10 कोटी मात्रा मिळणार; यामुळे पुढील 25 दिवस रोजची सरासरी 40 लाखांवर जाऊ शकते

देशात २१ जूनला ‘मेगा व्हॅक्सिनेशन डे’नंतर लसीकरणाचा वेग घटू लागला आहे. २१ ते २७ जूनपर्यंत ७ दिवसांत एकूण ४.१३ कोटी डोस दिले. त्यानंतरच्या ७ दिवसांत २.८२ कोटी डोस दिले. म्हणजे त्यात ३२% घट झाली. मात्र ३१ जुलैपूर्वी लसीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता कमीच आहे. केंद्र सरकारने आधीच म्हटले की, या महिन्यात राज्यांना १२ कोटी डोस मिळतील. पैकी ४ जुलैपर्यंत २ कोटी मात्रा मिळाल्या आहेत. उर्वरित १० कोटी डोस पुढील २५ दिवसांत राज्यांना मिळतील. ते सर्वच वापरले तर रोज दिल्या जाणाऱ्या लसींची सरासरी ४० लाख असेल. मात्र, आॅगस्टमध्ये राज्यांना १७ कोटी लसी मिळतील. यामुळे देशात लसीकरणाचा वेग वाढण्याची आशा आहे.

अनेक राज्यांत लसी संपल्या... लसीकरण केंद्रेही बंद
महाराष्ट्र, बंगाल, राजस्थान, पंजाब, छत्तीसगडसह काही राज्यांत लसींच्या तुटवड्यामुळे निम्म्याहून जास्त लसीकरण केंद्रे बंद ठेवली जात आहेत. राजस्थानात २ दिवस सेंटर बंद ठेवण्याची घोषणा झाली. २१ जूननंतर पुढील ७ दिवसांपर्यंत देशभरात रोज ६५ हजारांपेक्षा जास्त केंद्रांवर डोस दिले जात होते. आता केवळ ४० हजार केंद्रांवरच लसीकरण केले जात आहे. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, राज्यांकडे १.६७ कोटी लसी उरल्या आहेत. पुढील एका आठवड्यात राज्यांना २ कोटी डोस पुरवले जातील. त्यात खासगी रुग्णालयांच्या वाट्याचाही समावेश आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका ९५% कमी
नवी दिल्ली | कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर या संसर्गामुळे असलेला मृत्यूचा धोका ९५ टक्के कमी होतो. तर, एका डोसमुळे हा धोका ८३ टक्के कमी होत असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे. तामिळनाडूतील पोलिसांवर केलेल्या चाचण्यांनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांना कोरोना संसर्ग झाल्यावर ऑक्सिजनची गरजही ९४ टक्के कमी झाली.

बातम्या आणखी आहेत...