आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine Availability Latest News Update; Affidavit Submitted By Modi Govt, Supreme Court, Covishield, Covaxin, Bio E Sub Unit Vaccine, Zydus Cadila DNA Vaccine, Sputnik V; News And Live Updates 

लसींवर केंद्र सरकाराचे यू टर्न:सुप्रीम कोर्टात म्हणाले - डिसेंबरपर्यंत 135 कोटी डोस उपलब्ध होतील; मे महिन्यात 216 कोटी डोसचा केला होता दावा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोव्हिशील्ड-कोव्हॅक्सिन डोस कमी करण्यात आले

देशात एकीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने लसींच्या उपलब्धतेवरुन सर्वोच्च न्यायालयात यू टर्न घेतला आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत 135 कोटी डोस मिळणार असल्याचे सांगितले आहे.

यापूर्वी मे महिन्यात जेव्हा देशभरात लसींचा तुटवडा जाणवत होता तेव्हा सरकारने 31 डिसेंबरपर्यत 216 कोटी डोस उपलब्ध होतील असा दावा केला होता. यामुळे एकीकडे डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकार संबंधित राज्यांना कडक पाऊले उचलण्यास सांगत आहे.

13 मे रोजी केंद्र सरकारने काय म्हटले होते?
यावर्षीच्या ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान 216 कोटी डोस केले जाणार असल्याची माहिती नीति आयोगाचे सदस्य पॉल यांनी सांगितले होते. त्यासोबतच FDA आणि WHO ने मंजूर केलेल्या प्रत्येक लसीला भारतात परवानगी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दाव्यात काय फरक आहे?
केंद्र सरकारने गेल्या वेळी कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, बायो-ई सब युनिट लस, झायडस कॅडिला डीएनए, नोव्हावॅक्स, भारत बायोटेक नेजल व्हॅक्सिन, जेनोवा बायोफर्मा आणि स्पुतनिक-व्ही यांच्या उपलब्धतेविषयी माहिती दिली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रात सरकारने केवळ कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, बायो-ई सब यूनिट लस, झायडस कॅडिला डीएनए आणि स्पुतनिक-व्ही लसींची माहिती दिली आहे.

कोव्हिशील्ड-कोव्हॅक्सिन डोस कमी करण्यात आले
केद्र सरकारने ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान कोव्हिशील्डचे 75 कोटी आणि कोव्हॅक्सिनचे 55 कोटी डोस उपलब्ध असणार असल्याचा दावा केला होता. परंतु, आता कोव्हिशील्डचे 50 कोटी तर कोव्हॅक्सिनचे 40 कोटी मात्रा उपलब्ध राहील. दरम्यान, स्पुतनिक-व्हीची मात्रादेखील 15.6 कोटी वरून 10 कोटींवर आणली आहे.

बातम्या आणखी आहेत...