आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine Developed At Oxford University To Be Tested In India, Manufacturing To Begin Soon

व्हॅक्सीनची ट्रायल भारतात:ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये तयार झालेल्या कोरोना व्हॅक्सीनचे परीक्षण भारतात होईल, लवकरच मॅन्युफॅक्चरिंग सुरू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संशोधक म्हणाले- व्हॅक्सीनचे काही साइड इफेक्ट्स आहेत, पण पॅरासिटामोल खाऊन ठीक करता येतील

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये तयार झालेल्या कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनचे ट्रायल लवकरच भारतात होणार आहे. लायसंस मिळाल्यानंतर प्रक्रीया पुढे जाईल. ऑक्सफोर्डसोबत व्हॅक्सीनवर काम करत असलेल्या भारतीय फर्मने ही माहिती दिली आहे. लँसेंट मेडिकल जरनलमध्ये प्रकाशित ट्रायलच्या रिजल्टनुसार, व्हॅक्सीन AZD1222 चे परीणाम खूप चांगले राहिले आहेत. याचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत आणि हे व्हॅक्सीन शरीरात अँटीबॉडी आणि किलर टी-सेल्स वाढवण्यास मदत करतो.

संशोधकांचे म्हणने आहे की, व्हॅक्सीनचे काही साइड इफेक्ट्स आहेत, पण पॅरासिटामोल खाऊन ठीक करता येतील. जगातील सर्वात मोठी व्हॅक्सीन बनवणारी कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे हेड अदर पूनावाला म्हणाले की, आम्ही व्हॅक्सीनच्या रिझल्टवर खुश आहोत.

23 एप्रिलला मानवी चाचणी सुरू झाली होती

पूनावाला म्हणाले की, ट्रायलच्या लायसंससाठी एका आठवड्यात अर्ज दाखल करणार आहोत. मंजूरी मिळताच आम्ही व्हॅक्सीनचे ट्रायल सुरू करणार आहोत. आम्ही मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीनचे मॅन्युफैक्चरिंग करणार आहोत. ऑक्सफोर्डचे व्हॅक्सीन 100 पेक्षा जास्त देशात तयार करण्यात येत असलेल्या व्हॅक्सीनपैकी एक आहे. 23 एप्रिलला या व्हॅक्सीनची मानवी चाचणी सुरू झाली होती.

देशात सध्या COVAXIN चे ट्रायल सुरू आहे

लँसेटचा रिव्ह्यू तेव्हा आला, जेव्हा भारतात आधीपासूनच स्वदेशी COVAXIN व्हॅक्सीनचे ट्रायल सुरू होते. एम्स-दिल्लीचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, संशोधकांना परीणामांच्या पहिल्या टप्प्यावर जाण्यासाठी अंदाजे तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

व्हॅक्सीन काय आहे ?

हे व्हॅक्सीन ChAdOx1 nCoV-19 सर्दीचा व्हायरस (एडेनोवायरस)च्या कमजोर व्हर्जनचा वापर करुन तयार केले आहे. हा व्हायरस चिम्पांजीमध्ये होणारे इंफेक्शन आहे. जेनेटिकली बदल करुन याला व्हॅक्सीनसाठी तयार केले आहे.