आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हरियाणाचे मंत्री आणि अनिल विज कोरोना पॉझिटिव आढळले आहेत. शनिवारी सोशल मीडियावर त्यांनी स्वतःच याविषयी माहिती दिली. कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनच्या परीक्षणासाठी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी 14 दिवसांपूर्वीच अंबालामधील हॉस्पीटलमध्ये स्वतः भारत बायोटेकची Covaxin लस घेतली होती. ते पॉझिटिव्ह आल्यामुळे भारतीय व्हॅक्सीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर आता कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.
भारत बायोटेकचे स्पष्टीकरण - दोन डोजनंतरच व्हॅक्सीन प्रभावी
अनिल विज पॉझिटिव्ह आल्यानंतर कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले. भारत बायोटेकने निवेदन जारी केले की, कोव्हॅक्सिनचे 2 ट्रायल शेड्यूल आहेत. दोन डोज 28 दिवसांमध्ये दिले जाणार होते. दूसरा डोज 14 दिवसांनंतर दिला जाणार आहे. यानंतरच याच्या एफिकेसी कळतील. कोव्हॅक्सिन अशा पद्धतीने बनवली आहे. जी दोन डोज घेतल्यानंतरच प्रभाव दाखवले.
तिसरी ट्रायल 20 नोव्हेंबरपासून सुरू झाली होती
कोरोनाशी लढण्यासाठी, भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन बनवली आहे. ज्याची सध्या देशात चाचणी सुरू आहे. तिसरी ट्रायल 20 नोव्हेंबरपासून सुरू झाली होती. या अंतिम टप्प्यात अनिल विज यांना पहिला डोस देण्यात आला होता. मंत्री विज यांनी या चाचणीसाठी स्वयंसेवक होण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोज 28 दिवसानंतर दिला जाणार होता. मात्र यापुर्वीच त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
20 रिसर्च सेंटरवर तिसरी ट्रायल
देशाच्या 20 रिसर्ज सेंटरवर कोरोना व्हॅक्सिनची तिसरी ट्रायल केली जात आहे. जवळपास 26 हजार लोकांना व्हॅक्सीन दिली जाईल. या सेंटरमध्ये PGIMS रोहतकही सामिल आहेत. भारत बायोटिक इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)सोबत मिळून ही ट्रायल करत आहे. पहिल्या दोन फेजमध्ये ज्या लोकांना ही कोरोना व्हॅक्सिन देण्यात आली होती, त्यांमध्ये कोणताही साइड इफेक्ट दिसला नव्हता. कोणत्याही वॉलंटियरला कोरोना संक्रमण होण्याचा रिपोर्ट नाही.
असा दिला जातोय डोज
काउंसलर : रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्वात पहिले वालंटियर्सची काउंसलिंग होते. यामध्ये दोन काउंसलर लावले आहेत. या दरम्यान 18 पानांचे कंसेंट लेटरही भरुन घेतले जाते.
हेल्थ असेसमेंट : येथे काउंसिंलिंगनंतर वॉलंटियर्सच्या आरोग्याचे पूर्ण परीक्षण केले जाते. यासोबतच कोरोना टेस्टही केली जाते. येथे दोन डॉक्टर्स आणि दोन नर्सची टीम आहे.
व्हॅक्सीनेशन : दोन प्रोसेसमधून गेल्यानंतर अखेरला लसीचा डोज दिला जातो. यासाठी एक डॉक्टर आणि चार नर्सेस काम करतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.