आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेरोनाची लस घ्यायची की नाही हे लोकांच्या इच्छेवर अवलंबून असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, लसीचा पूर्ण डोस घ्यावा हा सल्ला असेल. देशात ६ लसींच्या चाचण्या सुरू आहेत. भारतात उपलब्ध लसही इतर देशांतील लसीइतकीच प्रभावी असेल, असे मंत्रालयाने नमूद केले आहे. संसर्ग होऊन गेलेल्या लोकांनीही लसीचा पूर्ण डोस घ्यावा, कारण यातून चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
आरोग्य आणि फ्रंटलाइन वर्कर्सना प्राधान्य, उपलब्धतेच्या आधारे ५० वर्षांवरील लोकही यादीत असू शकतात
कोरोना संसर्ग झालेल्या लोकांनाही लस दिली जाऊ शकेल?
आजाराची लक्षणे संपल्यानंतर १४ दिवसांनी म्हणजे पूर्ण संसर्गमुक्त झाल्यावर लस दिली जाईल. तेव्हाच ती परिणामकारक ठरेल.
देशात अनेक कंपन्यांच्या लसी तयार होत आहेत, अशात नेमकी कोणती लस घ्यायला हवी?
ड्रग नियामक ज्या कंपनीला परवाना देईल तीच लस सुरक्षित असेल. कारण, लस सुरक्षित असेल तरच परवाना मिळेल.
भारतात कोरोना लस उपलब्ध व्हावी यासाठी २ ते ८ अंश तापमानाची (वाहतुकीदरम्यानही) व्यवस्था आहे का?
भारत जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान राबवेल. ही व्यवस्था झाली आहे.
देशी लस इतर देश, विशेषत: अमेरिका-युरोपांत तयार झालेल्या लसीपेक्षा किती सुरक्षित आहे? पूर्ण सुरक्षित असेल, तरच परवानगी मिळेल.
लसीकरणासाठी कोणते लोक पात्र असतील, यासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे का?
आरोग्य आणि फ्रंटलाइन कार्यकर्त्यांना प्राधान्य असेल. उपलब्धतेच्या आधारे ५० वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना डोस दिला जाऊ शकतो. अशा लोकांना लसीकरणावेळी मोबाइलवर माहिती कळवली जाईल.
नोंदणी न करता लस दिली जाऊ शकते?
नोंदणीविना लस दिली जाणार नाही. यासाठी नोंदणीकृत कागदपत्रे आवश्यक. उदा. आधार कार्ड, व्होटर आयडी, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा जॉब कार्ड, पब्लिक लिमिटेड कंपनीचे ओळखपत्र, पेन्शन पेपर इत्यादी. फोटो नसलेले ओळखपत्र असेल तर लस दिली जाणार नाही.
लोकांना याची माहिती कशी मिळू शकेल?
तुमच्या रजिस्टर मोबाइलवर याची तारीख, वेळ आणि स्थळ ही माहिती दिली जाईल.
लस घेतल्यानंतर लोकांनी कोणत्या प्रकारची काळजी घेण्याची गरज असेल?
लस घेतल्यानंतर बूथवर अर्धा तास विश्रांती घ्यावी लागेल. साइड इफेक्ट झाले तर तेथेच कळतील. दुसरा डोस घेतल्यानंतरही मास्क वापरावाच लागेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.