आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीवरून राजकारण:कोरोनाची लस कुण्या पक्षाची नाही, मी आनंदाने घेईन; ओमर अब्दुल्लांचा अखिलेश यादव यांना टोला

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही लस कुण्या एका पक्षाची नाही तर मानवतेशी जोडली गेलेली आहे : ओमर अब्दुल्ला

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोनाची लस ही भाजपची लस असल्यामुळे मी ती टोचून घेणार नसल्याचे म्हटले होते. त्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपण आनंदाने कोरोनाची लस घेणार आहोत. कारण ही लस कुण्या एका पक्षाची नाही तर मानवतेशी जोडली गेलेली आहे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. ओमर अब्दुल्ला यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

काय म्हणाले होते अखिलेश यादव?

भाजपवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे भाजपकडून आलेली लस आम्ही टोचून घेणार नाही. जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा सर्वांना मोफत लस दिली जाईल, मात्र आम्ही भाजपची लस टोचून घेऊ शकत नाही. असे समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser