आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine Latest News Update; Narendra Modi Government, Biological E Corona Vasccine, Made In India Vaccine, Covaxin, Bharat Boitech

मोठी बातमी:लवकरच भारताला मिळणार कोरोना व्हॅक्सीनचे 30 कोटी डोस, केंद्र सरकारने 'या' स्वदेशी कंपनीसोबत केला मोठा करार

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायोलॉजिकल-ई कंपनीकडून सरकार 30 कोटी डोस खरेदी करणार
  • केंद्र सरकारकडून कंपनीला 1500 कोटी रुपयांचे अॅडवांस पेमेंट

देशात सध्या कोरोना व्हॅक्सीनची मोठी कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतातील एका कंपनीसोबत मोठा करार केला आहे. मोदी सरकार हैदराबादमधील व्हॅक्सीन तयार करणारी कंपनी बायोलॉजिकल-ईकडून व्हॅक्सीनचे 30 कोटी डोस खरेदी करणार आहे. हे व्हॅक्सीन ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 दरम्यान तयार केले जातील. केंद्र सरकारने यासाठी कंपनीला 1500 कोटी रुपयांचे अॅडवांस पेमेंटदेखील केले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू

पहिल्या आणि दुसऱ्या फेजच्या ट्रायलमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आल्यानंतर बायोलॉजिकल-ई आता व्हॅक्सीनच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायल्सच्या तयारीत आहे. ही व्हॅक्सीन एक आरबीडी प्रोटीन सब-यूनिट व्हॅक्सीन आहे. विशेष म्हणजे, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिननंतर ही दुसरी स्वदेशी व्हॅक्सीन आहे.

सरकार मदत करतीये

देशात जास्तीत-जास्त लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारला भरपूर लसींची गरज आहे. म्हणूनच केंद्र सरकार बायोलॉजिकल-ईला वेळोवेळी मदत करत आहे. या अंतर्गत सरकारने कंपनीला क्लिनिकल ट्रायलसाठी 100 कोटी रुपये दिले असून, इतर रिसर्चसाठी आणखी मदत पुरवणार आहे.

मॉडर्ना आणि फायजरसोबत चर्चा सुरू

यापूर्वी बुधवारी मॉडर्ना आणि फायजरच्या कोरोना व्हॅक्सीनला देशात लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार त्यांच्या अटी मान्य करण्यास तयार झाले आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सांगितले की, जगातील मोठे देश आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून या लसींना आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली असेल, तर भारतात यांना कुठल्याही ट्रायल्सशिवाय परवानगी दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...