आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine Latest News Update; Pfizer Corona Vaccine, Pfizer Vaccine Emergency Use Approval In India, Coronavirus Outbreak In India, Corona Vaccine News And Live Updates

फायझर भारताला लस देण्यास तयार:अमेरिकन कंपनीने केंद्राकडे ठेवली नुकसान भरपाईची अट, म्हणाले - ही लस 12+ वयोगटासह नवीन स्ट्रेनवर जास्त प्रभावी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या परिस्थितीत लसीचा पुरवठा करणे सामान्य नाही - फायझर

देशात एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहे. तर दुसरीकडे लसींची कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातून एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. अमेरिकन कंपनी फायझरने भारत देशाला लस देण्यासाठी सहमती दर्शवली आहे. सर्वात आधी ही लस भारताला मिळत असून यामुळे 12 वर्ष वयोगटावरील लोकांसह कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर जास्त प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यासोबतच कंपनीने केंद्र सरकारकडे नुकसान भरपाईचीदेखील अट ठेवली आहे.

कंपनीने पुढे बोलताना म्हटले की, या लसीला 2-8 अंश तापमानात एक महिन्यापर्यंत ठेवता येईल. जुलै ते ऑक्टोबर 2021 पर्यंत देशात 5 कोटी डोस देण्यार असल्याचे फायझरने सांगितले. नुकसानी भरपाईसह अन्य काही सवलतीदेखील फायझरने मागितल्या आहेत.

या परिस्थितीत लसीचा पुरवठा करणे सामान्य नाही
फायझर कंपनीने नुकतेच भारतीय अधिकाऱ्यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यामध्ये कंपनीने लसीवर अनेक देशांसह जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) ट्रायल डेटा सादर केला. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताशी झालेल्या बैठकीत फायझरने सध्याची परिस्थिती चांगली नसून यामुळे लसीच्या पुरवठ्याकडे सामान्य पद्धतीने पाहायला नको असल्याचे फायझरने म्हटले.

केंद्राने या मागण्यांवर केला विचार
या बैठकीदरम्यान, केंद्र आणि फायझरचे चेअरमॅन अल्बर्ट बुर्ला भारतात लसीच्या अॅप्रूव्हलमध्ये गती आणण्यासाठी तीन महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्याचे सुत्रांनी सांगितले. यामध्ये टिकेची केंद्राकडून खरेदी, नुकसान भरपाई आणि अॅप्रूव्हलनंतर संशोधन सेवांच्या मागण्यांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

डब्लूएचओवर भारताने विश्वास ठेवावा
फायझरच्या लसीला 44 देशांसह डब्ल्यूएचओकडून इमरजेंसी अॅप्रूव्हल मिळाले आहे. यामध्ये अनेक युरोपीय देशांचादेखील समावेश आहे. त्यामुळे या आधारावर भारताने आमच्या लसीला तात्काळ परवानगी द्यावी असे फायझर कंपनीचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...