आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine Mixing; ICMR Has Revealed In Its Study That The Combination Of Covaxin And Covishield Vaccines Conducted On 18 People And It Has Elicited Better Safety And Immunogenicity News And Updates

देशात पहिल्यांदा व्हॅक्सीन मिक्सिंग:ICMR च्या अभ्यासात दावा - कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या मिक्स डोसने जास्त इम्युनिटी वाढली, डेल्टा व्हेरिएंटवरही प्रभावी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोना रुग्णांची संख्या 3 कोटींच्या पुढे गेली आहे

ICMR ने देशातील कोरोना मिक्सिंगवर झालेल्या पहिल्या अभ्यासाचे निकाल जाहीर केले आहेत. अभ्यासात असे म्हटले आहे की कोव्हॅक्सीन आणि कोविशील्डच्या मिक्स डोसने कोरोनाव्हायरस विरूद्ध चांगले संरक्षण मिळते. ICMR च्या मते, अॅडेनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्म लस आणि इनअॅक्टिवेटेड होल व्हायरस व्हॅक्सीनचा मिक्स डोस घेणे सुरक्षित आहे. या दोन लसींचे वेगवेगळे डोस एकाच लसीच्या दोन डोसपेक्षा चांगली प्रतिकारशक्ती देतात.

कोरोना लस मिक्सिंगचा हा अभ्यास ICMR ने यूपीमध्ये मे-जूनच्या मध्यात केला होता. DGCI च्या तज्ज्ञ पॅनेलने कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या मिश्रित डोसच्या अभ्यासाची शिफारस केली होती. यानंतर, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरला देखील लसीच्या मिक्स ट्रायल डोसची परवानगी देण्यात आली होती.

कोविड-19 व्हॅक्सीनच्या मिक्स अँड मॅचची गरज काय?
चांगला इम्यून रिस्पॉन्स :
दोन वेगवेगळे लसींचे डोस असतील तर हे जास्त वेळपर्यंत अँटीबॉडी आणि इम्यून रिस्पॉन्स देतील.
म्यूटेशंस आणि व्हेरिएंट्स : वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीने बनलेल्या व्हॅक्सीन कोरोनाच्या व्हेरिएंटवरही उपयुक्त ठरल्या आहेत.
सप्लायचा शॉर्टेज : सप्लाय मर्यादित आहे.नपहिला डोस ज्या लसीचा दिला आहे, योग्य वेळी तोच डोस मिळावा हे आवश्यक नाही.
सुरक्षा चिंता : ब्लड क्लॉटिंगमुळे जर्मनी, फ्रान्स, यूके आणि कॅनडाने तरुणांवर कोवीशील्डचा वापर बंद केला आहे. अशा वेळी मिक्सिंगची गरज निर्माण झाली.

इम्यूनिटी बूस्टर आहे व्हॅक्सीनचा मिक्स अँड मॅच?

  • ऑक्सफोर्डमध्ये झालेल्या Com-COV अभ्यासात समजले आहे की, व्हॅक्सीन मिक्सिंगने अँटीबॉडी जास्त बनल्या आणि इम्यून रिस्पॉन्स चांगला राहिला.
  • काही लोकांना सौम्य साइडइफेक्ट्सही दिसले, पण वैज्ञानिकांनी म्हटले की, हे शॉर्ट टर्म साइड इफेक्ट मजबूत इम्यून सिस्टमची निशाणी आहे.

लसीची कमतरता दूर करण्यास मदत होईल
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि डेल्टा व्हेरिएंटच्या धोक्याच्या दरम्यान, हा अभ्यास खूप दिलासादायक आहे. मिश्रित डोस लसीची कमतरता दूर करण्यास मदत करेल. त्याच वेळी, यामुळे वेगवेगळ्या लसीच्या डोसमधून लोकांमध्ये प्रतिकूल परिणामांची भीती देखील कमी होईल.

देशात आतापर्यंत 5 लसींना मान्यता देण्यात आली आहे
जॉनसन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला देशात गेल्या आठवड्यातच आपत्कालीन वापराची मंजुरी देण्यात आली आहे. कोवीशील्ड, कोव्हॅक्सीन, स्पुतनिक व्ही आणि मॉडर्ना नंतर देशात आपत्कालीन वापराची मान्यता मिळवणारी ही 5 वी लस आहे. आयसीएमआरच्या पूर्वीच्या अभ्यासात, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला कोरोनाच्या डेल्टा प्रकाराविरूद्ध प्रभावी असल्याचे सांगितले गेले होते.

देशात कोरोना रुग्णांची संख्या 3 कोटींच्या पुढे गेली आहे
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोनाची एकूण 3 कोटी 19 लाख 34 हजार 455 प्रकरणे समोर आली आहेत. तर 491 नवीन मृत्यूंसह एकूण 4 लाख 27 हजार 862 लोकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या देशात सक्रिय प्रकरणांची संख्या कमी होऊन 4 लाख 6 हजार 822 वर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...