आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine News An Updates; Covishield And Covaxin Get Approval After Recommendation Of Expert Panel; DCGI Convenes Press Conference Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅक्सीनबाबत सर्वात मोठी बातमी:सीरम इंस्टीट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयची मंजुरी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जायडल कॅडिला हेल्थकेअरच्या जायकोव-डी ला फेज-3 ट्रायल्ससाठी परवानगी

कोरोना व्हॅक्सीनबाबत आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सीरम इंस्टीट्यूटच्या कोविशील्डला परवानगी दिली आहे. याशिवाय, जायडल कॅडिला हेल्थकेअरच्या जायकोव-डी ला फेज-3 ट्रायल्ससाठी परवानगी देण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आज पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले- 2 लसींना मान्यता मिळणे ही अभिमानाची बाब

DCGI कडे भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इंस्टीट्यूटच्या कोविशील्डला परवानगी देण्यासाठी शिफारस करण्यात आली होती. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या तज्ज्ञ समितीने दोन दिवसांपूर्वी ही शिफारस केली होती.

सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांचे ट्वीट

याच आठवड्यात सुरू होऊ शकते लसीकरण

कोरोनावर बनलेल्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी सीरमन इंस्टीट्यूटच्या कोविशील्डलाही परवानगी देण्याची शिफारस करण्यात केली होती. यानंतर शनिवारी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनलाही इमरजंसी अप्रुव्हल देण्यासाठी सशर्त मंजूरी देण्याची शिफारस करण्यात आली. आता या दोन्ही व्हॅक्सीनला DCGI कडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे, याच आठवड्यात देशभरात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्व तयारींचा आढावा घेण्यासाठी सध्या देशभार ड्राय रन सुरू आहे.

कोव्हॅक्सिनचे वैशिष्ट्य ?

कोव्हॅक्सिनच्या फेज-2 क्लिनिकल ट्रायल्सचे परीणाम 23 डिसेंबरला समोर आले होते. ट्रायल्स 380 मुले आणि वृद्धांवर केले होता.

3 मायक्रोग्राम आणि 6 मायक्रोग्रामचे दोन फॉर्मूले ठरवण्यात आले. दोन ग्रुप्स बनवण्यात आले. त्यांना दोन डोज चार आठवड्यांच्या अंतराने दिले.

फेज-2 ट्रायल्समध्ये कोव्हॅक्सिनने हाय लेव्हल अँटीबॉडी तयार केली. दुसऱ्या व्हॅक्सीनेशनच्या तीन महिन्यानंतर सर्व स्वयंसेवकांमध्ये अँचीबॉडीची संख्या वाढली.

ट्रायल्सच्या परीणांमांच्या आधारे कंपनीने दावा केला आहे की, कोव्हॅक्सिनमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडी सहा ते बारा महिन्यांपर्यंत शरीरात राहतील.

अँटीबॉडी म्हणजेच, शरीरातील ते प्रोटीन, जे व्हा३यरस, बॅक्टेरिया, फंगी आणि पॅरासाइट्सला निष्क्रीय करते.

कंपनीचा दावा आहे की, फेज-3 साठी देशभरात सर्वाधिक 23 हजार स्वयंसेवकांवर चाचणी झाली.

कोविशील्डचे वैशिष्ट्य ?

कोविशील्डच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या विश्लेषणातून खूप चांगले परिणाम दिसले आहेत.

स्वयंसेवकांना आधी अर्धा आणि नंतर पूर्ण डोज देण्यात आला. यातील कोणामध्येही साइड इफेक्ट दिसून आले नाहीत.

जेव्हा हॉफ डोज दिला, तेव्हा व्हॅक्सीनची इफिकेसी 90% होती. एका महिन्यानंतर फुल डोज दिल्यानंतर इफिकेसी 62% दिसून आली.

दोन्ही डोजमधील सरासरी इफिकेसी 70% आहे. सर्व परिणाम डेटाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत.

इफिकेसी जाणण्यासाठी व्हॅक्सीन लावल्यानंतरही एका वर्षापर्यंत वॉलेंटियर्सचे ब्लड सॅम्पल आणि इम्युनोजेनिसिटी टेस्ट केल्या जातील. इंफेक्शनची परीक्षण करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात सॅम्पल घेतले जाणार.

बातम्या आणखी आहेत...