आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Corona Vaccine News And Updates: Very Soon The Country May Get 4 More Vaccines; Bharat Biotech Gave 16.5 Lakh Doses Of Covaxine To The Government For Free

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लवकरच मिळेल अजून 4 व्हॅक्सीन:केंद्र सरकार सर्व डोस 14 जानेवारीपर्यंत खरेदी करणार, भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे 16 लाख डोस दिले मोफत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • केंद्र सरकारने म्हटले की, व्हॅक्सीनचा दुसरा डोस घेतल्याच्या 14 दिवसानंतर परिणाम दिसले

देशातील लसीकरणाच्या तयारींबाबत मंगळवारी केंद्र सरकारने वीकली रिपोर्ट सादर केली. यात सांगितले की, सीरम इंस्टीट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनशिवाय अजून 4 व्हॅक्सीनवर काम सुरू आहे. या सर्व व्हॅक्सीन विविध ट्रायल स्टेजमध्ये आहेत. यात जायडस कॅडिलाची व्हॅक्सीन आणि रशियातील स्पूतनिक- V तिसऱ्या फेजच्या ट्रायलमध्ये आहेत. याशिवाय बायोलॉजिकल-E आणि पुण्यातील जेनोवा कंपनीने पहिल्या फेजचे ट्रायल सुरू केले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, या सर्व व्हॅक्सीन भारतात तयार होत आहेत. येणाऱ्या काळात यातील सर्व किंवा काही व्हॅक्सीनच्या इमरजंसी वापराची मंजुरी मिळू शकते.

कोव्हॅक्सिनची किंमत 206 रुपये असेल

 • फायजर आणि बायोएनटेकच्या व्हॅक्सीनच्या एका डोसची किंमत 1,431 रुपये असेल.
 • मॉडर्नाच्या व्हॅक्सीनच्या एका डोसची किंमत 2,348 ते 2,715 रुपयापर्यंत असेल.
 • सिनोफार्म कंपनीच्या व्हॅक्सीनच्या एका डोसची किंमत 5,650 रुपये असेल.
 • सिनवॅक बायोटेकच्या व्हॅक्सीनची किंमत 1,027 रुपये असेल.
 • भारतात तयार झालेल्या कोविशील्ड व्हॅक्सीनची किंमत 200 रुपये प्रती डोस आहे.
 • कोव्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत 206 रुपये असेल.

कोव्हॅक्सिनच्या 55 लाख डोसची ऑर्डर दिली

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, भारत सरकारने सीरम इंस्टि्टयूट ऑफ इंडिया (CII) कडून 200 रुपये प्रती डोस (GST अतिरिक्त) च्या किमतीने कोविशील्डचे 1.10 कोटी डोससाठी ऑर्डर दिली आहे. याशिवाय कोव्हॅक्सिनच्या 55 लाख डोसचीही ऑर्डर दिली आहे. दरम्यान, भारत बायोटेकने 16.5 लाख डोस केंद्र सरकारला मोफत देणार असल्याचे म्हटले आहे.

लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिली

आरोग्य सचिवांनी सांगितले की, 16 जानेवारीपासून देशात व्हॅक्सीनेशन सुरू होणार आहे. याची संपूर्ण तयारी झाली आहे. केंद्र सरकार सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या संपर्कात आहेत. राज्यांसोबत यासाठी 26 व्हर्चुअल बैठका आणि ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित झाले आहेत. यातून देशात 2360 मास्टर ट्रेनर, 61 हजार प्रोग्राम मॅनेजर, 2 लाख व्हॅक्सीनेटर आणि 3.7 लाख व्हॅक्सीनेशन टीम मेंबर्सला ट्रेनिंग दिली आहे.

व्हॅक्सीन स्टोरेजसाठी 4 मोठे स्टोअर

भारत सरकारने व्हॅक्सीन स्टोरेजसाठी चार मोठे स्टोअर (GNMSD) बनवले आहेत. हे करनाल, कोलकाता, चेन्नई आणि मुंबईत आहेत. याशिवाय सर्व राज्यात कमीत कमी एक लोकल व्हॅक्सीन स्टोअर तयार केला आहे. याशिवाय, मोठ्या राज्यात या लोकल स्टोअरची संख्या वाढवली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 9, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 4, केरळमध्ये 3, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये 2-2 स्टोअर आहेत.

बातम्या आणखी आहेत...