आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेपर्वाई:लसीचा तुटवडा, पण अपव्ययसुरूच; तामिळनाडू आघाडीवर, 11 एप्रिलपर्यंत देशभरात 23 टक्के डोस वाया गेले

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाकार असताना काही राज्यांत मात्र डोस वाया जात असल्याचे वास्तव आहे. कोरोनाच्या भयावहतेपासून बचाव करण्यासाठी संशोधक जास्तीत जास्त लसीकरणावर भर देत आहेत. अनेक राज्यांत मात्र २३ टक्क्यांपर्यंत लसींचा अपव्यय झाला आहे. लसीबद्दलचा बेजबाबदारपणा करणाऱ्या राज्यांत तामिळनाडू (१२.१० टक्के) आघाडीवर आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार राज्यांनी ११ एप्रिलपर्यंत एकूण १०.३४ कोटी डोसपैकी ४४.७८ लाख डोस वाया घातले आहेत. डोस वाया घालणाऱ्या राज्यांत हरिणाया (९.७४ टक्के), पंजाब (८.१२ टक्के), मणिपूर (७.८ टक्के) व तेलंगणा (७.५५ टक्के) यांचा समावेश आहे. अनेक राज्यांनी एकूण डोसपैकी सुमारे २३ टक्के वाया घातले आहेत. केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोराम, गोवा, दमन-दीव, अंदमान-निकोबार बेट समूह आणि लक्षद्वीपमध्ये लसींचे नुकसान झालेले नाही. केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली असतानाच लसींच्या अपव्ययाचे वास्तव उजेडात आले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, आंध्र प्रदेश, आेडिशासारख्या राज्यांनी लसींच्या तुडवड्याच्या तक्रारी केल्या होत्या.

रेमडेसिविरची उपलब्धता वाढणार, ४० कंपन्यांत उत्पादन
नवी दिल्ली | कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपचारांच्या प्रोटोकॉलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन निदानीय पद्धतीचा भाग असूनही मोठ्या संख्येने रुग्णांना हे इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला जात आहे. लोक इंजेक्शनसाठी भटकू लागले आहेत. त्याची कमतरता दूर करण्यासाठी सेंट्रल ड्रग्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीआे) नियमांत काही बदल केले आहेत. आता इंजेक्शनचे परीक्षण जलद करण्याीच परवानगी मिळाली आहे.

10.34 कोटी डोसपैकी 44.78 लाख डोस गेले वाया
राज्यांनी किती डोस वाया घातले

राज्य डोस(लाख)
तामिळनाडू 5.04
उत्तर प्रदेश 4.99
गुजरात 3.56
महाराष्ट्र 3.56
बिहार 3.37
हरियाणा 2.46
कर्नाटक 2.14
तेलंगण 1.68
पंजाब 1.56

अनावश्यक होतोय वापर : सरकार
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) प्रो. व्ही.के. पॉल व एम्सचे संचालक प्रो. रणदीप गुलेरिया म्हणाले, सगळ्या रुग्णांना रेमडेसिविरची गरज नाही. केवळ प्राणवायूचा पुरवठा करावा लागत असलेल्या रुग्णांसाठी ते जास्त लाभदायक आहे. इतर रुग्णांना दिल्यावर नुकसानही होऊ शकते. या इंजेक्शनला केवळ इन्व्हेस्टिगेशनल थेरपीच्या पातळीवर वापराची परवानगी होती. परंतु गैरवापर होतोय.

बातम्या आणखी आहेत...