आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine Sputnik Light Has No Emergency Clearance, Drug Regulator Asks For Data On Phase 3 Trials In Russia

सिंगल डोस व्हॅक्सिनला उशीर:कोरोना व्हॅक्सिन स्पुतनिक लाइटला आपत्कालीन मंजुरी नाही, ड्रग रेग्युलेटरने रशियातील फेज-3 ट्रायलचा डेटा मागितला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या ड्रॅग रेग्युलेटरने रशियाच्या स्पुतनिक लाइट या लसीच्या आपत्कालीन मंजुरीची मान्यता नाकारली आहे. ऍथॉरिटीने सिंगल डोसच्या या व्हॅक्सिनच्या फेज-3 ट्रायलचीही गरजही नाकारली आहे. या विषयावर सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीची (SEC)ची बैठक झाली होती.

कमिटीच्या शिफारशींनुसार, स्पुतनिक लाइट आणि स्पुतनिक-V मध्ये समान सामान कंपोनंट-1 आहेत. स्पुतनिक-V चा सेफ्टी आणि इम्युनिटी डेटा याआधीच भारतीय लोकसंख्येवर केलेल्या ट्रायलमधून मिळाला आहे. याला भारतीय औषध नियंत्रक जनरलकडून मान्यताही मिळाली आहे. मग स्वतंत्र आणि एकसमान ट्रायल आयोजित करण्यासाठी अपूर्ण डेटा आणि औचित्य योग्य वाटत नाही.

डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेने मंजुरी मागितली होती
SECच्या शिफारसी गुरुवारी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (CDSCO) वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या. डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांनी DGCIला एक प्रस्ताव दिला होता. यामध्ये स्पुतनिक लाइटच्या मार्केट अथॉरायझेशनची मागणी करण्यात आली होती. यासाठी, रशियामधील फेज-1 आणि 2 ट्रायलचा डेटा आणि भारतात फेज-3 क्लिनिकल ट्रायल आयोजित करण्याचे प्रोटोकॉल सादर केले गेले होते.

CDSCOच्या एक्स्पर्ट कमिटीने या अर्जावर विचार केला. त्यानंतर समितीने शिफारस केली की, फर्मने व्हॅक्सनीच्या मार्केट अथॉरायझेशनसाठी स्पुतनिक लाइटच्या फेज-3 ट्रायलचा सेफ्टी आणि कार्यक्षमता डेटा सादर करावा. हे ट्रायल रशियात झाले आहे, परंतु याचा डेटा देण्यात आलेला नाही.

व्हॅक्सिन 79.4% प्रभावी आहे.
रशियाच्या स्पुतनिक V लसीचा सध्या यूरोप आणि अमेरिका वगळता जगातील 60 देशांमध्ये वापर होत आहे. स्पुतनिक V ला बनवणाऱ्या मॉस्कोच्या गमालय रिसर्च इन्स्टिट्यूटने सिंगल डोस व्हॅक्सिन स्पुतनिक लाइट नावाने बनवली आहे. कोरोना संक्रमणाशी लढण्यात ही व्हॅक्सिन 79.4% प्रभावी आहे.

ही लस विषाणूच्या सर्व नवीन स्ट्रेनवर प्रभावी
या लसीच्या फेज-3 चाचणीमध्ये 7000 लोकांचा सहभाग होता. या चाचण्या रशिया, युएई आणि घाना येथे झाल्या. 28 दिवसांनंतर त्याच्या डेटाचे विश्लेषण केले गेले. परिणामांमध्ये असे आढळले आहे की ही लस विषाणूच्या सर्व नवीन स्ट्रेनवर प्रभावी आहे. त्याचा डेटा असे सूचित करतो की हे इतर अनेक डबल डोस लसींपेक्षा अधिक प्रभावी आहे.

स्पुतनिक लाइटचे यामुळे खास

  • याची ओव्हरऑल एफिकेसी 79.4% आहे. व्हॅक्सीन घेणाऱ्या 100% लोकांमध्ये 10 दिवसांनंतरच अँटीबॉडीज 40 टक्के वाढल्या.
  • व्हॅक्सीन घेणाऱ्या सर्व लोकांमध्ये कोरोना व्हायरसच्या S-प्रोटीनविरोधात इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप झाला.
  • या व्हॅक्सीनचे सिंगल डोस असल्यामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये लसीकरण वाढवले जाऊ शकेल.
  • स्पुतनिक लाइटला 2 ते 8 डिग्री टेम्प्रेचरवर स्टोअर केले जाऊ शकते. यामुळे ते सहज ट्रान्सपोर्ट होऊ शकेल.
  • ज्या लोकांना पहिलेच संक्रमण झाले आहे, ही व्हॅक्सीन त्यांच्यावरही प्रभावी आहे.
  • व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोरोनाच्या गंभीर परीणामांचा धोका कमी होईल. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडणार नाही.
बातम्या आणखी आहेत...