आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine Third Dose | Registrations Third Corona Vaccine Opens Today On CoWin App

तिसऱ्या डोससाठी आजपासून नोंदणी:बूस्टर डोसच्या नोंदणीसाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज नाही; फ्रंटलाइन वर्कर्ससह ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना प्राधान्य

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाविरुद्ध खबरदारी म्हणून लसीच्या तिसऱ्या डोससाठीची नोंदणी आज (शनिवारी) संध्याकाळपासून सुरू होत आहे. 10 जानेवारीपासून दिल्या जाणाऱ्या या तिसऱ्या लसींकरिता ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग अशा दोन्ही व्यवस्था ठेवण्यात आल्या आहेत.

देशात तिसऱ्या डोसमध्ये प्रायोरिटी ग्रुप म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले लोक, आणि 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रिकॉशनरी (खबरदारी) व्हॅक्सीनची घोषणा 25 डिसेंबर रोजीच केली होती.

केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार, तिसरे डोस घेण्यासाठी दुसरी डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे उलटणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रिकॉशन डोससाठी पात्र होईल तेव्हा त्याला एक मेसेज पाठवला जाईल. हा मेसेज कोविनच्या माध्यमातून येणार आहे. त्यानंतरही तिसरा डोस घेता येईल.

तिसऱ्या डोससाठी डॉक्टरचे सर्टिफिकेट लागेल का?

प्रिकॉशन डोस 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या आणि एकापेक्षा अधिक रोगांनी ग्रस्त असलेल्यांनाच दिला जाणार आहे. केंद्र सरकारने कोमॉर्बिडिटी अंतर्गत 22 आजारांना समाविष्ट केले आहे. कोमॉर्बिड डिसीस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तिसऱ्या डोससाठी प्रमाणपत्र दाखवण्याची गरज पडणार नाही. तरीही अशा लोकांनी तिसर लस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्रिकॉशन डोससाठी कोविन (CoWIN) वर स्लॉट बुक करणे बंधनकारक नाही. मात्र, कुठल्या लसीकरण केंद्रावर ते दिले जात आहे याची माहिती केवळ CoWin App वर मिळेल. यानंतरच लाभार्थ्यांचे सर्टिफिकेट दिसायला लागतील.

प्रिकॉशन डोस मोफत राहील का?

प्रिकॉशन डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत दिले जाणार आहेत. पण, खासगी रुग्णालयांमध्ये ते घेतल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील. सर्व नागरिकांना मोफत लसीकरणाचा हक्क आहे असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. तरीही ज्यांना लसीकरणासाठी किंमत देणे शक्य असेल ते खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन सुद्धा लस घेऊ शकतील.

2 कोटी 15+ मुला-मुलींनी घेतली लस
देशात 15+ वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले आहे. आतापर्यंत 2 कोटी जणांनी याचा लाभ घेतला आहे. यासोबतच 2 कोटी 19 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. 15+ व्हॅक्सीनसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे नोंदणी करते येईल.

बातम्या आणखी आहेत...