आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, सरकार प्रत्येक नागरिकाला लस उपलब्ध करून देण्याच्या तयारीला लागले आहे. यासाठी नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत २०- २५ कोटी भारतीयांना कोरोनाची लस टोचण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. साप्ताहिक कार्यक्रम संडे संवादमध्ये हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ४० ते ५० कोटी डोस मिळवून ते लोकांना देण्याची सरकारची योजना आहे. थोडेफार साइडइफेक्टची शक्यता आहे, मात्र त्यामुळे लसीच्या सुरक्षेबाबत धोका नाही. सरकारने रशियाची लस स्पुटनिक-व्ही घेण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आमच्या आशेचा आधार...
अाॅक्सफर्डने सांगितले- आपली लस येत्या तीन महिन्यांत तयार होईल
लंडन | लसीच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, येत्या तीन महिन्यांत कोरोनाची लस तयार होईल. टाइम्सच्या वृत्तात शास्त्रज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की, देशात ईस्टरच्या आधी प्रत्येक वयस्कराला लसीचा डोस दिला जाऊ शकतो. लस तयार करणे व तिच्या वितरणाची तयारी करणाऱ्या सरकारी सूत्रांनी सांगितले की, मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत मुले वगळता उर्वरित सर्वांना डोस देण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.
एवढे डोस कसे मिळतील...
आपला भर ३ व्हॅक्सिन कँडिडेट्सवर, त्यांची उत्पादन क्षमता एवढ्या डोससाठी पुरेशी
व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन कमिटीच्या एका अधिकाऱ्यानुसार भारतात सध्या सीरम, भारत बायोटेक व जाइडस कॅडिला दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी करताहेत. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निकालात जर लस परिणामकारक राहिली तर लसीचे उत्पादन सुरू केले जाईल. जर तिन्ही कंपन्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार उत्पादन सुरू केले तर प्रत्येक व्यक्तीला दोन डोस यानुसार जुलैपर्यंत २० ते २५ कोटी लोकांना लस देण्याइतके उत्पादन केले जाईल.
सर्वांना लसीचे दोन डोस
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, कोरोना प्रतिरोधकतेच्या डेटावर सरकारचे लक्ष आहे. महामारी नियंत्रणात आणण्यासाठी सिंगल डोस लस मिळाल्यास चांगले होईल. मात्र, सिंगल डोसमुळे जेवढी इम्युनिटी पातळी हवी असते तेवढी बऱ्याच वेळा येत नाही.
जी राज्ये लसीसाठी प्राधान्य यादी देतील त्यांना प्राथमिकता
हर्षवर्धन यांनी सांगितले की, लस तयार झाल्यानंतर लसीकरणाची योजना आखत आहोत. आरोग्य मंत्रालय एक फॉर्म तयार करत आहे. यात राज्य प्राधान्यक्रमाच्या गटांची माहिती भरतील. त्या लोकांना आधी लस मिळेल. हर्षवर्धन यांनी सांगितले, लस विशेषत: कोरोनाच्या लढाईत उतरलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आधी मिळेल. ऑक्टोबरपर्यंत हे पूर्ण होण्याची आशा आहे. राज्यांकडून कोल्ड चेन तसेच लसीचा साठा व वितरणाबाबतची माहिती मागितली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.