आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारी थांबवण्यासाठी व्हॅक्सीन तयार करणाऱ्या कंपन्यांकडून चांगल्या बातम्या येत आहेत. ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेकाची लस 'कोवीशील्ड' मोठ्या प्रमाणात झालेल्या मानवी चाचणीत 70% परिणामकारक आढळून आली आहे. कंपनीचा दावा आहे की, व्हॅक्सीन 90% पर्यंत इफेक्टीव्ह ठरू शकते.
यादरम्यान, भारतात या व्हॅक्सीनचे प्रोडक्शन करणाऱ्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने परत एकदा स्पष्ट केले आहे की, त्यांचा फोकस सर्वात आधी भारतात व्हॅक्सीन डिस्ट्रीब्यूट करण्यावर आहे. SII ही लस 222 रुपयात सरकारला देईल, पण एखाद्या व्यक्तीला वयक्तितरित्या ही लस हवी असल्यास त्याला एक हजार रुपये मोजावे लागतील. तर, रशियाने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेत तयार होत असलेल्या फायजर आणि मॉडर्नापेक्षा त्यांची व्हॅक्सीन स्पूतनिक-V स्वस्त असेल.
ऑक्सफोर्डच्या व्हॅक्सीनचा परिणाम महत्वाचा
ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सीनची इफेक्टीव्हनेस आणि सेफ्टीचा संपूर्ण जगावर चांगला परिणाम पडेल. या व्हॅक्सीनला 2 ते 8 डिग्रीपर्यंतच्या तापमानात स्टोअर करता येते, त्यामुळे ही व्हॅक्सीन जगभर पोहचवणे सोपे जाईल. यापूर्वीच, फायजर, मॉडर्ना आणि रशियाच्या स्पूतनिक-V ने 90% इफेक्टिव असल्याचा दावा केला आहे. पण, समस्या ही आहे की, फायजरच्या व्हॅक्सीनला -70 डिग्री सेल्सियसवर स्टोरेज करावे लागते. त्यामुळे यासाठी सध्याच्या कोल्ड चेन आणि रेफ्रिजरेशन सुविधेला अपग्रेड करावे लागेल.
ऑक्सफोर्डच्या व्हॅक्सीनची काय किंमत असेल ?
SII चे CEO अदार पूनावाला म्हणाले की, वैयक्तिकरीत्या कोणाला लस हवी असल्यास 1,000 रुपये द्यावे लागतील. पण, सरकारला ही लस फक्त 222 रुपयात मिळेल. जानेवारी 2021 पर्यंत 10 कोटी आणि मार्चपर्यंत 40 कोटी लस तयार केल्या जातील. तसेच, 2021 च्या अखेरपर्यंत 300 कोटी लस तयार करण्याचे लक्ष्य आहे. व्हॅक्सीन तयार झाल्यावर सर्वात आधी भारतात डिलिव्हर होईल, त्यानंतर इतर देशात पाठवल्या जातील.
रशियाने म्हटले- स्पूतनिक V सर्वात स्वस्त असेल
रशियाने दावा केला आहे की, त्यांची व्हॅक्सीन स्पूतनिक-V अमेरिकेच्या फायजर आणि मॉडर्नाच्या व्हॅक्सीनपेक्षा स्वस्त असेल. परंतू, अद्याप रशियाने या व्हॅक्सीनची माहिती सार्वजनिक केली नाही. फायजरने शनिवारी आपली व्हॅक्सीन इमरजेंसी अप्रूवलसाठी USFDA समोर सादर करण्यात आली. दोन डोजची किंमत 2,900 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. तर, मॉडर्नाच्या व्हॅक्सीनचे दोन डोज 3,700 ते 5,400 रुपयांपर्यंत असू शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.