आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine Update : India made Corona Vaccine Approved Next Week; Serum Handed Over Test Data To CDSCO

व्हॅक्सिन अपडेट:भारतात निर्मित कोरोना लसीला पुढील आठवड्यात मंजुरी शक्य; सीरमने सीडीएससीओला सोपवला चाचणीचा डेटा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात सर्वदूर लस वितरणासाठी ग्रँड चॅलेंज सुरू

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला (सीडीएससीओ) आपल्या कोविशील्ड या लसीच्या तिसऱ्या टप्प्याचा मानवी चाचणीचा डेटा दिला आहे. भारतीय नियामक त्याचा अभ्यास करत आहेत.

सीडीएससीओच्या सूत्रांनुसार, ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाच्या कोविशील्ड लसीच्या आपत्कालीन वापराबाबत ब्रिटनमध्ये सोमवारी बैठक होणार आहे. तेथे मंजुरी मिळाली तर सुमारे एक आठवड्यात भारतातही तिला आपत्कालीन मंजुरी मिळू शकते. त्यामुळे भारताचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे, कारण जेथे ही लस तयार झाली आहे. सध्या तेथे ितच्या आपत्कालीन वापराची परवानगी नाही. सीरमतर्फे देशात होत असलेल्या वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचा सेफ्टी डेटा देण्यात आला आहे. त्याचाही आढावा घेतला जात आहे. सीडीएससीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीरम डेटाचे तज्ज्ञ त्याचा अभ्यास करत आहेत. त्यानंतर विषयतज्ज्ञ समितीची बैठक होईल. तीत डेटाचा अभ्यास होईल, नंतर समितीच्या शिफारशीनुसार अंतिम निर्णय होईल. दरम्यान, ऑक्सफर्ड लसीच्या मंजुरीआधी फायझर लसीची पहिली खेप २८ डिसेंबरला भारतात येण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

भारतात सर्वदूर लस वितरणासाठी ग्रँड चॅलेंज सुरू

आरोग्य मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत ‘कोविन’ चॅलेंज सुरू केले. नोंदणी कालावधी २३ डिसेंबर ते १५ जानेवारी असा आहे. पहिल्या ५ अर्जदारांना कोविन अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) उपलब्ध केले जाईल. निवड झालेले २ लाख रुपये जिंकू शकतात. मूल्यांकनानंतर अव्वल दोन सहभागींना ४० लाख व २० लाख रु. चा पुरस्कार मिळेल.

अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया, इस्रायल व कॅनडात २४ लाखांवर नागरिकांचे झाले आहे लसीकरण

अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया आणि कॅनडात आतापर्यंत सुमारे २४ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. स्वित्झर्लंडमध्ये ९० वर्षांवरील एका महिलेला पहिली लस देण्यात आली. स्वित्झर्लंड लसीकरण सुरू करणारा ७ वा देश ठरला आहे.

बुकिंग : लोकसंख्येच्या प्रमाणात भारत ४४ व्या स्थानी

कॅनडाने लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक ५५१.३% बुकिंग केले. अमेरिकेने १६९% बुकिंग केले आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत ४४ व्या स्थानी असला तरी एकूण बुकिंगमध्ये जगात पहिल्या स्थानी आहे.

बातम्या आणखी आहेत...