आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्याननंतर विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे. व्हॅक्सीनवर सुरू असलेल्या या राजकारणादरम्यान भारत बायोटेकचे एमडी कृष्णा एल्ला यांनी आपली बाजू मांडली आहे. एल्ला म्हणाले की, व्हॅक्सीनवरुन राजकारण होत आहे. पण, मी सांगू इच्छितो की, माझ्या कुटुंबातील कुणीच राजकारणात नाही. आमच्या कंपनीकडे व्हॅक्सीन बनवण्याचा अनुभव आहे, त्यामुळे आम्हाला मंजुरी मिळाली आहे.
एल्ला यांचे स्पष्टीकरण
आम्ही ग्लोबल कंपनी आहोत. आम्ही फक्त भारतातच क्लीनिकल ट्रायल करत नाहीयेत. आम्ही ब्रिटनसह 12 देशांमध्ये ट्रायल केले आहेत. सध्या आम्ही पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि इतर देशांमध्ये ट्रायल करत आहोत. आम्ही फक्त भारतीय नाही, तर ग्लोबल कंपनी आहोत.
आमच्या कंपनीकडे व्हॅक्सीन तयार करण्याचा अनुभव आहे. आम्ही आतापर्यंत 123 देशांसाठी व्हॅक्सीन बनवल्या आहेत. इतका मोठा अनुभव असलेली आमची एकमेव कंपनी आहे.
अनेकजण म्हणत आहेत की, आमच्या डेटामध्ये पारदर्शकता नाही. लोकांनी थोडा सयंम बाळगावा आणि इंटरनेटवर आम्ही पब्लिश केलेले आर्टिकल वाचावे. आतापर्यंत आमचे 70 पेक्षा जास्त आर्टिकल इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश झाले आहेत.
आमच्यावर आरोप लावणे योग्य नाही. व्हॅक्सीनवर अनेकजण गॉसिप करत आहेत. आमच्यासोबत असे करू नका. मेरेक इबोला व्हॅक्सीनचे ह्यूमन क्लीनिकल ट्रायल कधीच पूर्ण झाले नाही, तरीदेखील WHO ने त्याला लायबेरिया आणि गीनियामध्ये वापरासाठी इमरजंसी अप्रुव्हल दिले होते.
अखिलेश यादव यांनी उपस्थित केला होता प्रश्न
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सर्वात आधी या व्हॅक्सीनव प्रश्न उपस्थित केला होता. शनिवारी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, थाळ्या वाजवून कोरोनाला पळवून लावणाऱ्या सरकारवर विश्वास नाही. आमचा भाजप सरकारच्या लसीकरण योजनेवर विश्वास नाही. आम्ही भाजपचे व्हॅक्सीन लावणार नाहीत. जेव्हा आमची सरकार बनले, तेव्हाच आम्ही व्हॅक्सीन लावून घेणार.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.