आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine Update : Russia To Supply 10 Crore Doses Of Sputnik V Vaccine To India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीन:भारताला स्पुटनिक-व्ही लसीचे दहा कोटी डोस देणार रशिया, नोव्हेंबरपर्यंत लस शक्य

मुंबई3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • सीरम संस्थेला पुन्हा मिळाली वैद्यकीय चाचणीची परवानगी

रशियाच्या आरडीआयएफ संस्थेने भारतात काेरोना लस स्पुटनिक व्हीच्या वैद्यकीय चाचण्या आणि वितरणासाठी भारतीय फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबसोबत हातमिळवणी केली आहे. त्यांच्यातील करारानुसार आरडीआयएफ भारतीय कंपनीला लसीच्या १० कोटी डोसचा पुरवठा करेल. आरडीआयएफचे सीईओ किरिल दिमित्रिएव यांनी सांगितले की, चाचणी यशस्वी ठरली तर लस नोव्हेंबरपर्यंत भारतात उपलब्ध होईल.

लसनिर्मितीसाठी आरडीआयएफची इतर चार भारतीय कंपन्यांसोबतही बोलणी सुरू आहे. कंपनीनुसार, कोरोनाविरुद्ध बचावासाठी अनेक लसींवर काम करण्याबाबत अनेक देश व संस्थांत एकमत होत आहे. ही लस एडिनोव्हायरल व्हेक्टर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. अनेक दशके त्यावर २५० पेक्षा जास्त क्लिनिकल स्टडी झालेल्या आहेत. त्यात ती सुरक्षित आढळली असून तिचे दीर्घकालीन दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत.

सीरम संस्थेला पुन्हा मिळाली वैद्यकीय चाचणीची परवानगी

ऑक्सफर्ड विद्यापीठाद्वारे अॅस्ट्राझेनेकासह विकसित केल्या जाणाऱ्या कोरोना लसीची वैद्यकीय चाचणी देशात पुन्हा सुरू होऊ शकते. भारतात लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात संयुक्तपणे चाचणी घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याच्या अटीसह चाचणी पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ११ सप्टेंबरला चाचणी थांबवली होती. पूर्व यूकेमध्ये चाचणीनंतर एका स्वयंसेविकेची प्रकृती बिघडल्याने अॅस्ट्राझेनेकानेही चाचणी रोखली होती.