आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine Updates : We Will Produce 300 Million Doses Of Corona Vaccine For India By December, A Promising Claim By The Serum Institute

कोरोना व्हॅक्सिनबाबत आशा:डिसेंबरपर्यंत भारतासाठी कोरोना लसीचे 30 कोटी डोस तयार करू, लसीची चाचणी घेत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटचा आशादायक दावा

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करारांर्तगत सीरमने तयार केलेले निम्मे डोस गॅव्हीला मिळणार

कोरोना संकटावर मात करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असताना एक आशादायी बातमी आहे. यंदा डिसेंबरपर्यंत भारतासाठी कोरोनावरील लसीचे २० ते ३० कोटी डोस तयार केले जातील, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. तसेच अंतिम टप्प्यातील लस पुढील वर्षी मार्चपर्यंत उपलब्ध होईल, अशी आशा सीरमचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.

जाधव म्हणाले, ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाचा परवाना मिळाल्यानंतर लस तत्काळ बाजारात येईल. कोरोनावर मात करण्यासाठी सीरम पाच वेगवेगळ्या उत्पादनांवर काम करत आहे. दरम्यान, तयार झालेल्या डोसपैकी निम्मे डोस करारांतर्गत गॅव्हीलाही दिले जातील. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाद्वारे विकसित आणि अॅस्ट्रेझेनेकासोबत भारतात सीरम कोरोनावरील लस तयार करत आहे.

लस कधी मिळणार ?नियामकांचे समाधान झाल्यास आपत्कालीन वापराचा परवाना शक्य

लसीच्या उपलब्धतेबाबत डॉ. जाधव म्हणाले, काही कारणांमुळे लसीची चाचणी थांबवावी लागली होती. आम्ही डिसेंबरच्या अखेरपर्यंत डीसीजीआयला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा उपलब्ध करून देऊ. नियामकाच्या सहमतीनंतर आम्हाला एका महिन्यात लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवाना मिळू शकतो. नंतर पुढील प्रक्रियेसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे जाऊ. या प्रक्रियेचा वेळ वाचवण्यासाठी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी अर्ज करू. पुढील वर्षी मार्चपर्यंत लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

प्राधान्य कुणाला? आधी आरोग्य कर्मचारी, नंतर वृद्धांना दिली जाईल कोरोनावरील सीरमची लस

सीरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतात १८ पेक्षा जास्त वय असलेल्या युवकांवर लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोनावरील लस सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. कारण कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते आघाडीवर आहेत. दुसऱ्या स्थानी ६० वर्षे किंवा यापेक्षा जास्त वयाचे वृद्ध असावे. यानंतर इतरांना लस मिळावी. तसेच १८ ‌पेक्षा कमी वय असलेल्यांचा डेटाही उपलब्ध व्हावा, जेणेकरून त्यांनाही प्राधान्य दिले जाईल.

डोस कधी?

दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांच्या आधारे आपत्कालीन स्थितीत लसीचा डोस देता येऊ शकतो कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परिणामांच्या आधारे आणीबाणीच्या स्थितीत लसीच्या वापरास नियामकाने ठरवल्यास परवानगी देता येईल.

बातम्या आणखी आहेत...