आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccine ; Use Of Coronavirus Vaccine On Animals Started In India, Hopeful Of Happy Results In 4to6 Months

कोरोनादरम्यान चांगली बातमी:देशात कोरोना व्हायरसच्या औषधाचे प्राण्यांवर प्रयोग सुरू, 4-6 महिन्यात चांगले परिणाम येण्याची शक्यता

अहमदाबाद3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जायडस कॅडिला कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर शर्विल पटेल. - Divya Marathi
जायडस कॅडिला कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर शर्विल पटेल.
  • भारतीय कंपनी जायडस कॅडिला कोरोना व्हायरसचे औषध बनवत आहे
  • 10 वर्षांपूर्वी स्वाइन फ्लू आजाराची लसदेखील याच कंपनीने तयार केली होती

विमुक्त दवे
देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. यातच आता एक चांगली बातमी आली आहे. देशात कोरोना व्हायरसच्या औषधाचे प्राण्यांवर प्रयोग सुरू झाले आहेत. येत्या 4-6 महिन्यात याचे परिणाम येणे सुरू होतील. गुजरातमधील जायडस कॅडिला कंपनी हे औषध तयार करत आहे. यात कंपनीने 2010 मध्ये देशात स्वाइन फ्लू आजाराची सर्वात पहिले औषध तयार केले होते.

मार्च महिन्यापासून औषधावर काम सुरू
मार्च महिन्यापासून कंपनी है औषध बनवण्याच्या कामात लागली आहे. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर शर्विल पटेल यांनी दैनिक भास्करशी केलेल्या खास बातचीतमध्ये सांगितले की, आम्ही या आजाराच्या औषधावर काम करत आहोत. औषध बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण आम्हाला खात्री आहे की, लवकरच हे औषध तयार होईल.

हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या उत्पादनात दोन कंपन्याची 80% भागीदारी
मलेरिया आजारात उपयोगास येणाऱ्या हायड्रोक्सीक्लोरोक्विन या औषधाचे भारतात सर्वात जास्त उत्पादन इप्का लॅबोरेटरीज आणि जायडस कॅडिला या दोन कंपन्या करतात. फार्मा सेक्टरच्या जानकारांनी सांगितल्यानुसार, भारतात हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या भारतातील एकूण उत्पादनापैकी या दोन कंपन्याचीं 80% भागीदारी आहे. जायडस कॅडिला दर महिन्याला 20 टन हायड्रोक्सीक्लोरोक्विन बनवू शकते. सरकारने मंगळवारी हायड्रोक्सीक्लोरोक्विनसह 28 औषधांवरील निर्यातबंदी हटवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे निर्यातबंदी हटवण्याची आणि अमेरिकेला औषध पुरवण्याची विनंती केली होती.

कच्चा मालासाठी चीनवर अवलंबुन राहण्याची गरज नाही
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे भारतीय फार्मास्यूटिकल्स इंडस्ट्री चिंतेत आहे. कारण, अनेक कंपन्यांचा कच्चा माल हा चीनमधूनच येतो. परंतू, जायडस कॅडिलाचे मॅनेजिंग डायरेक्टर शर्विल पटेल यांनी सांगितले की, आम्ही चीनवर जास्त अवलंबुन नाहीत. सामान्यतः आम्ही 60 ते 90 दिवसांची इन्वेंट्रीसोबत चालतो. कोरोनामुळे आमच्या सप्लामध्ये कोणतीच अडचण
येणार नाही.

भारतीय कंपन्या हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे उत्पादन वाढवणार
सरकारने औषध निर्माण करणाऱ्या कंपन्याना हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे उत्पादन आणि याची उपलब्धता निश्चित करण्यास सांगितले आहे. सरकारकडून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या 10 कोटी टॅबलेट बनवण्याची ऑर्डर जायडस आणि इप्का लॅबोरेटरीजसारख्या कंपन्याना देण्यात आल्या आहेत. या टॅबलेट 50-60 लाख रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशा आहेत. याव्यतिरीक्त होणारे जास्तीचे उत्पादन अमेरिका आणि इतर देशांमध्ये निर्यात केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...