आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून लसीकरण:जानेवारीत 10 दिवसच टोचली जाणार लस, रुग्णालयांतील इतर वैद्यकीय सेवा बाधित होऊ नये म्हणून निर्णय

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ताप, सर्दी, खोकला असलेल्यांना लस नाही

देशात शनिवारपासून जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू होईल. पंतप्रधान मोदी मोहिमेचा श्रीगणेशा करतील. मात्र, रुग्णालयांतील इतर वैद्यकीय सेवा बाधित होऊ नयेत म्हणून जानेवारीत १० दिवसच लसीकरण होईल. ते १० दिवस कोणते याचा निर्णय राज्ये घेतील. म्हणजे राज्यांत जानेवारी महिन्यातील राहिलेल्या १५ पैकी १० दिवसच लसीकरण होईल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार पहिल्या दिवशी आघाडीवरील सुमारे ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दिल्लीत एकूण ८१ लसीकरण केंद्रे आहेत. ७५ केंद्रे दिल्ली सरकारच्या अंतर्गत असून त्यावर ‘कोविशील्ड’ लस पाठवण्यात आली आहे. बाकीचे केंद्र सरकारच्या अंतर्गत असून त्यावर ‘कोव्हॅक्सिन’ पाठवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानुसार सलग लसीकरणामुळे कर्मचारी थकतील. काही राज्य व केंद्रशासित प्रदेशात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सलग १५ दिवस लसीकरणाची गरज भासणार नाही. यामुळे १० दिवसच लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ताप, सर्दी, खोकला असलेल्यांना लस नाही
- प्रत्येक केंद्रावर एका दिवसात १०० जणांना लस दिली जाईल. यामुळे प्रत्येक केंद्रावर ११० डोस पाठवले जाईल. १०% लसी रिझर्व्ह असतील. वाहतुकीत खराब किंवा उघडलेल्या डोसचा वापर न करण्याचे निर्देश आहेत. सुरुवातीच्या १० दिवसांपर्यंत देशात सुमारे २,९३४ लसीकरण केंद्रे असतील. नंतर ती ५ हजारांवर नेली जातील. यानंतर दररोज ५ लाखांवर लोकांना लस टोचली जाईल.

- व्हायरल फीव्हर, सर्दी, खोकला, ताप असलेल्यांना लस घेण्यास मनाई आहे. ज्या लोकांकडे अँड्रॉइड फोन नाही ते आपल्या कुटुंबीय, मित्रांचा फोन वापरू शकतात. कारण की, दाेन्ही डोसचे लसीकरण झाल्यानंतर याच फोन क्रमांकावर एक क्यूआर कोड येणार आहे. यामुळे लस टाेचल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

पोलिअो लसीकरण ३१ जानेवारीनंतर राबवणार
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ‘देशभरात कोरोना लसीकरणामुळे पोलिअो लसीकरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. आता पोलिआे लसीकरण मोहीम ३१ जानेवारीला राष्ट्रीय लसीकरणदिनी सुरू हाेईल.’

पहिल्या दिवशी ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस
लसीकरणासाठी ‘कोविशील्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ला आपत्कालीन वापराची मंजुरी देण्यात आली आहे. त्या देशभरात पोहोचवण्याचे काम सुरू आहे. राज्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हिशेबाने डोसचे वाटप करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...