आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccines Reach Every Corner Of The Country; Vaccination Of 3 Lakh Health Workers At 3 Thousand Centers On The First Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वे सन्तु निरामया:देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली लस; पहिल्या दिवशी 3 हजार केंद्रांवर 3 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

पवनकुमार | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात आले 9.63 लाख डोस, राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या 511 वरून 358 पर्यंत घटवली

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी देशभरात सुमारे ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-१९ पासून बचावासाठी लस देण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी सर्व राज्यांत ३ हजार लसीकरण केंद्रे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ जानेवारीला मोहीम सुरू होत आहे. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लस घेणाऱ्यांशी चर्चाही करू शकतात.

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, पहिल्या दिवशी ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. फ्रंटलाइन वर्कर्सनाही याच महिन्यात लस दिली जाईल. त्यात पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. ही संख्या पाच ते सात लाखांपर्यंत जाऊ शकते. पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रावर फक्त १०० जणांनाच लस दिली जाईल. १० दिवसांनंतर मोठ्या केंद्रावर २ व्हॅक्सिनेटरची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर २०० लोकांना लस दिली जाऊ शकेल. सूत्रांनुसार, फ्रंटलाइन वर्कर्सचा डेटा कोविन साइटवर २६ जानेवारीपर्यंत अपलोड करावा, असे निर्देश राज्यांना दिले आहेत. २९-३० जानेवारीपासून त्यांचेही लसीकरण सुरू केले जाईल, असे सांगण्यात आले. त्यांची संख्या सुमारे २ कोटी आहे. त्यांनाही मोफत लस दिली जाईल.

सर्व राज्यांत १.१० कोटी डोस

कोविशील्ड लसीचे १ कोटी १० लाख डोस देशातील सर्व राज्यांत पोहोचवण्यात आले आहेत. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या ५५ लाख डोसपैकी सध्या दोन लाख ५० हजार डोस राज्यांना मिळाले आहेत. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटनुसार, कंपनीने भारत सरकारच्या मागणी केलेल्या कोविशील्ड लसीचे ९०% म्हणजे सुमारे १ कोटी ९ लाख डोस निश्चित केलेल्या स्थळांपर्यंत पोहोचवले आहेत. सुमारे ९० हजार डोस पाठवणे बाकी आहे. ते बुधवार-गुरुवारपर्यंत पाठवले जातील. भारत बायोटेकने बुधवारी सांगितले की, आम्ही आमची कोव्हॅक्सिन लस हैदराबादसह १२ शहरांत पोहोचवली आहे.


पोलिओ लसीकरण
लांबले

केंद्र सरकारने पोलिओ लसीकरण कार्यक्रम लांबणीवर टाकला. यंदा ही मोहीम १७ जानेवारीपासून ३ दिवस सुरू राहणार होती. त्यात ५ वर्षांपेक्षा लहान मुलांना पोलिओ डोस दिला जातो. भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण १० वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये आढळला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही वर्ष २०१४ मध्ये भारताला पोलिओमुक्त जाहीर केले होते.

आधारद्वारे लिंक :

लसीकरणाआधी मोबाइल नंबरला आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. त्या नंबरवर ओटीपी आणि क्यूआर कोड यावा त्यामागील हेतू आहे. याच क्यूआर कोडद्वारे लसीकरणानंतर प्रमाणपत्र मिळेल. मात्र, आधार अनिवार्य नाही. दुसऱ्या फोटो ओळखपत्राच्या आधारावरही लस दिली जाईल.

चीनची लस सर्वात महाग

सुरुवातीच्या १० कोटी डाेससाठी कोविशील्ड लसीची किंमत २०० रुपये आहे. यानंतर बाजारात ती १ हजार रुपयांना मिळेल. कोव्हॅक्सिन २०६ रु., फायझर-बायोएनटक १४३१ रु., मॉडर्ना २३४८ ते २७१६ रु., सायनोफार्म ५६५० रु., सिनोव्हॅक बायोटेक १०२७ रु., नोव्हाव्हॅक्स १११४ रु., गामलेया सेंटर ७३४ रु. तसेच जॉन्सन अँड जॉन्सनची लस ७३४ रुपयांत मिळेल.

महाराष्ट्रात आले ९.६३ लाख डोस, पहिल्या दिवशी ३५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

राज्यात लसीकरण केंद्रे ५११ वरून ३५८ केली आहेत. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांसाठी १ ला‌ख ३०,५०० काेविशील्ड लसींचा साठा बुधवारी आैरंगाबादेत दाखल झाला आहे.

9.63 लाख लसींचे राज्यात वितरण

35 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

08 लाख कर्मचाऱ्यांची राज्यभरात नोंदणी

बातम्या आणखी आहेत...