आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccinne Updates: Approval Of Virafin Injection Of Curative Zydus On Corona; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गांधीनगर:कोरोनावर गुणकारी झायडसच्या विराफिन इंजेक्शनला मंजुरी; एका डोसने 7 दिवसांत 91 % रुग्ण निगेटिव्ह

गांधीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेअखेर 50 हजार कुप्या

कोरोनाविरुद्धच्या लढाईत गुणकारी ठरलेल्या झायडस कॅडिला कंपनीच्या विराफिन या औषधाच्या आपत्कालीन वापरास औषधी नियामक डीसीजीआयने शुक्रवारी मंजुरी दिली. या औषधामुळे कोरोनातून रुग्ण लवकर बरे होऊ शकतील. भारतात या औषधाचा वापर गेल्या १० वर्षांपासून होत असला तरी कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध नव्याने तयार करण्यात आले आहे.

या औषधाच्या वापरानंतर ७ दिवसांत ९१.१५ टक्के रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली असल्याचा दावा झायडसने केला आहे. तिसऱ्या टप्प्यात चाचणीदरम्यान २५ केंद्रांवरील कोरोना रुग्णांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. याचा वापर केल्यास रुग्णास ऑक्सिजन देण्याची गरज पडत नाही. हे सर्वात प्रभावी औषध ठरू शकते, असे मानले जाते. “दै. भास्कर’शी बोलताना झायडसचे एमडी शर्विल पटेल यांनी सांगितले, की या औषधाचा अत्यंत चांगला गुण दिसून आला. मात्र, सध्या हे औषध खुल्या बाजारात विकले जाणार नाही. प्रारंभी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर रुग्णालयातच ते उपलब्ध असेल.

किती डोस, किंमत किती?
या इंजेक्शनचा फक्त एकच डोस घ्यावा लागेल. या औषधाची किंमत काय असेल याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मात्र, सामान्यांना परवडेल अशीच किंमत असेल.

काळाबाजार झाला तर?
काळाबाजार होणार नाही. कारण, खुल्या बाजारात हे औषध मिळणारच नाही. सध्या फक्त डॉक्टर्सना पुरवठा केला जाईल. ज्या डॉक्टरांना हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावयाचे आहे अशा देशभरातील डॉक्टरांशी कंपनी संपर्कात आहे.

कोरोना रुग्णांना पहिल्या टप्प्यातच मिळू शकेल चांगला आराम
या औषधाचे वैशिष्ट्य असे आहे की, एक तर सात दिवसांत याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात. सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही औषध किंवा इंजेक्शनच्या तुलनेत हे औषध प्रभावी ठरेल. दुसरे म्हणजे, रुग्णांना पहिल्या टप्प्यातच या औषधामुळे चांगला गुण येईल. तूर्त हे औषध खुल्या बाजारात विकले जाणार नाही.

इंजेक्शनचा कधीपासून वापर?
पटेल यांच्यानुसार, मे महिन्याच्या अखेरपर्यंत इंजेक्शनच्या ५० हजार कुप्या तयार होतील. यानंतर त्याचा वापर सुरू होईल. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले की दरमहा १५ लाख कुप्या तयार होतील.

बातम्या आणखी आहेत...