आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे हरिद्वारच्या कुंभातील भाविकांच्या अलोट गर्दीने चिंतेत भर टाकली आहे. एक एप्रिलपासून झालेल्या कुंभात पहिल्या दिवशी सुमारे दोन लाख लोक आले होते. त्यानंतर दररोज सरासरी ५० हजार भाविक येत आहेत. अशीच गर्दी राहिल्यास कुंभ कोरोनाचे सुपर स्प्रेड ठरू शकते. म्हणूनच हा मेळा नियोजित कालावधीच्या आधीच समाप्त करावा, असा इशारा केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला. मेळा प्रशासन व सरकारच्या दाव्यानुसार संसर्गापासून बचावासाठी दिशा-निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सचिव स्तरावरील बैठकीत वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्याने कुंभादरम्यान परिस्थिती बिघडू शकते, असे स्पष्टपणे नमूद केले. हरिद्वार कुंभ ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे. गेल्या दोन दिवसांत हरिद्वारमध्ये ३४९ नवे बाधित आढळून आले. त्याच्या चार दिवस आधी सरासरी ७५-८- रुग्ण होते. सरकार त्यासाठी एक टीम तयार करत आहे. तीर्थ यात्रेकरूंनी मास्क घालावे. डिस्टन्सिंगचे पालन करावे, यासाठी साधू-संत, धर्मगुरूंची मदत घेतली जाणार आहे. ते जनतेला आवाहन करतील. केंद्र सरकार कुंभला वेळेच्या आधी समाप्त करण्याबाबत विचार करत नाही, असे सूत्रांनी सांगितले. नियमांबाबत बेपर्वाई दिसून येते. लाेकांमध्ये अकारण भीती पसरू नये यासाठी जनजागृती मोहिम चालवली जाणार आहे.
डेहराडून-हरिद्वार जिल्हा कोर्ट दोन आठवडे बंद
नैनिताल उच्च न्यायालयाने कोरोना महामारीचा विचार करून डेहराडून व हरिद्वार जिल्हा कोर्ट व कुटुंब न्यायालय दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे निर्देश दिले. अत्यावश्यक प्रकरणांत मात्र सुनावणी होईल. कोर्टाचे ३० टक्के कर्मचारी कामावर असतील.
बेेपर्वाई : मेळ्याच्या आरंभी मुख्यमंत्री विनामास्क
स्थानिक प्रशासनाने कुंभात येण्यासाठी ७२ तासांपूर्वीच्या आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह अहवाल आणणे अनिवार्य केले आहे. हरिद्वार, ऋषिकेश, देवप्रयाग हा भाग कुंभ क्षेत्रात येतो. कुंभात सात प्रवेशद्वारांतून येता येईल. प्रवेशद्वारावर अँटिजन टेस्ट व थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे. एखाद्या वाहनात यात्रेकरू अँटिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास संपूर्ण वाहनाला माघारी पाठवले जात आहे. सोमवारी भगवानपूर एंट्री पॉइंट येथून पूर्व यूपीतून आलेल्या बस परत पाठवण्यात आल्या. गंगा घाटांवर प्रवेशापूर्वी निगेटिव्ह अहवाल दाखवणे अनिवार्य आहे. तेथेही अँटिजन तपासणी केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.