आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिका व युराेपात थैमान घालणारी काेराेना महामारी भारतात तूर्तास नियंत्रणात असल्याचे दिसते. १५ डिसेंबरला भारतात संसर्ग दर २.९ टक्क्यांनी घटला. म्हणजे १०० तपासण्यांपैकी केवळ २.९ मध्ये काेराेनाबाधित आढळले. २३ सप्टेंबरला हा दर ९ टक्के हाेता. जागतिक आराेग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संसर्गाचा दर ५ टक्क्यांहून कमी असणे म्हणजे परिस्थिती नियंत्रणात समजली जाते. १०० तपासण्यांमागे जेवढे पाॅझिटिव्ह आढळून येतात, त्याला संसर्ग दर म्हटले जाते. भारतात गेल्या एक महिन्यात एकूण बाधितांच्या संख्येत १० लाख ५८ हजार ६८३ अशी वाढ झाली. म्हणजे ३० दिवसांत सुमारे १२ टक्के वाढ झाली. या दाैऱ्यात युराेपात बाधितांची संख्या ४६ टक्के व अमेरिकेत ४८ टक्क्यांनी वाढली. भारतात १५ डिसेंबरला बाधितांची एकूण संख्या ९९,३२,९०८ हाेती. १६ नाेव्हेंबरला आकडा ८८, ७४,२२५ हाेता. गेल्या एका महिन्यात भारतात काेराेनामुळे १३,५७१ लाेकांना प्राण गमवावे लागले. यादरम्यान अमेरिकेत ५८,४९२ लाेकांनी तर युराेपात १.४० लाखांहून जास्त लाेकांनी प्राण गमावले.
महाराष्ट्रात महिन्यात ७.८३ टक्के वाढले
देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यात महाराष्ट्राचा समावेश होतो. १६ नोव्हेंबरपासून आतापर्यंत एकूण बाधितांच्या संख्येत ७.८३ टक्के वाढ झाली. १६ नोव्हेंबरला एकूण १७, ४९, ७७७ बाधित होते. १५ डिसेंबरला संख्या १८,८६, ८०७ वर पोहोचली आहे. दुसरीकडे कर्नाटकमध्ये महिनाभरात एकूण बाधितांची संख्या ४.७ टक्क्यांनी वाढली. तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशच्या स्थिती सुधारणा झाली आहे.
सर्वाधिक मृत्युदराचे टाॅप-५ जिल्हे पंजाबात
सर्वाधिक मृत्युदराचे टाॅप-५ जिल्हे पंजाबात आहेत. राेपड अव्वल आहे. येथे मृत्युदर ५ टक्के आहे. तरणतारण (४.९ टक्के), संगरूर (४.५ टक्के), फतेहपूर साहिब (४.५ टक्के) कपूरथळा (४.१ टक्के) यांचा क्रमांक लागताे. राज्य ३.२ टक्क्यांसह सर्वात पुढे आहे. त्यानंतर महाराष्ट्र (२.६ टक्के), सिक्कीम (२.२ टक्के), गुजरात (१.८ टक्के), पश्चिम बंगाल (१.७ टक्के ) इत्यादी राज्यांचा समावेश आहे.
सरासरी सर्वात कमी संसर्ग बिहारमध्ये
भारतात १५ डिसेंबरला संसर्ग दर १.४५ हाेता. परंतु एकूण सरासरी संसर्ग दर ६.३ टक्के आहे. याबाबतीत बिहारची स्थिती चांगली आहे. एकूण संसर्ग दरात बिहार १.५ टक्क्यांवर आहे. झारखंड-२.५ टक्के, गुजरात-उत्तर प्रदेश- २.६ टक्के, महाराष्ट्र-१६ टक्के, गाेवा-१३.३ टक्के, नागालँड-१० टक्के, केरळ-९.६ टक्के यासारखी राज्यांची स्थिती कमकुवत राहिली, हे यावरून स्पष्ट होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.