आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआतापर्यंत देशातील बर्याच शहरांच्या सीवेज लाइनमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. परंतु आता या माध्यमातून कोरोना विषाणू तलाव व नद्यांच्या पाण्यापर्यंतही पोहोचल्याची पुष्टी झाली आहे. ही धक्कादायक माहिती अहमदाबादमधूनच समोर आली आहे. येथील जलस्रोत साबरमती नदी, कांकरिया आणि चांदोला तलावामध्ये कोरोना विषाणू आढळून आला आहे. गेल्या चार महिन्यांत तिन्ही स्रोतांमधून 16 नमुने घेण्यात आले होते, त्यापैकी 5 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
देशातील 8 संस्थांनी संशोधन केले
IIT गांधीनगरसह देशातील 8 संस्थांनी एकत्रितपणे हे संशोधन केले आहे. यात दिल्लीच्या JNU स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्सच्या संशोधकांचाही समावेश आहे. आसाममधील गुवाहाटी भागातील भारू नदीतून घेतलेला नमुनाही पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सांडपाण्याचे नमुने घेऊन केलेल्या तपासणी दरम्यान नदी आणि तलावांमध्ये कोरोना विषाणू पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.
यामुळे गुवाहाटी आणि अहमदाबादच्या जलस्रोतची निवड करण्यात अली
वास्तविक, अनेक सांडपाण्याचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर संशोधकांनी शुद्ध पाण्याच्या स्रोतांच्या संशोधनाच्या दिशेने काम सुरू केले. अहमदाबादमध्ये सर्वात जास्त वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहेत आणि गुवाहाटीमध्ये एकही नाही. या कारणास्तव, ही दोन्ही शहरे संशोधनासाठी निवडली गेली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.