आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक चार हजार रुग्णांची वाढ आश्चर्यजनक आहे. मात्र, ही सर्वोच्च संख्या नाही. आगामी काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली एम्सचे संचालक प्रो. रणदीप गुलेरिया यांच्या मते, मेचा शेवटचा आठवडा किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात रुग्णसंख्या सर्वोच्च राहू शकते. लॉकडाऊनमुळे सध्या रुग्णवाढीचे प्रमाण कमी आहे. एम्सच्या कम्युनिटी मेडिसीनचे प्रो. संजय रॉय सांगतात की, आता या गतीने रुग्णांची संख्या वाढत राहील. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक असू शकते. तर, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, महामारीचा सामना आपण कसा करतो, त्यावर रुग्णसंख्या अवलंबून राहील. आयसीएमआरचे डाॅ.गंगाखेडकर म्हणाले की, मजुरांच्या घरवापसीनंतरच्या स्थितीवर बरेच अवलंबून राहील.
राज्यांतून परतणाऱ्या मजुरांची तपासणी आवश्यक : सुजाता राव
माजी आरोग्य सचिव सुजाता राव यांनी सांगितले की, फिजिकल डिस्टन्सिंग हाच संरक्षणाचा सर्वात चांगला उपाय असल्याचे सरकार पहिल्यापासून सांगते आहे. मजूर मोठ्या संख्येने घरी परतत आहेत. राज्यात क्वचितच एवढे लोक क्वॉरंटाइन ठेवण्याची सुविधा असतील. सर्वांची चाचणी शक्य नाही. केवळ फिजिकल स्क्रीनिंगचा उपयोग नाही. राज्यांनी केरळप्रमाणे काम करायला हवे. जास्तीत जास्त चाचण्या केल्यावरच स्थिती नियंत्रणात येईल
.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.