आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 1 लाख 574 हजार 445 झाली आहे. संक्रमितांची संख्या वाढण्यासोबत चाचण्यांची संख्याही वाढली आहे. सरकारने बुधवारी सांगितले की, आतापर्यंत 435 सरकारी आणि 189 खासगी लॅबमध्ये एकूण 32 लाख 42 हजार 160 चाचण्या झाल्या आहेत. मागील 24 तासात एकूण 1 लाख 16 हजार 041 चाचण्या झाल्या.
Covid19.Org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आज सापडलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रात 2,190, तमिळनाडुतील 817, राजस्थान 144, पश्चिम बंगाल 183, कर्नाटक 135 रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशातील रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार 767 झाली आहे. यातील 83 हजार 04 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच, 64 हजार 425 ठीक झाले असू, 4,337 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या देशभरातील 930 रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. या रुग्णालयांमध्ये 1 लाख 58 हजार 747 आयसोलेशन, 20 हजार 335 आयसीयू आणि 69 हजार 076 ऑक्सजीन सपोर्टेड बेड उपलब्ध आहेत.
मंगळवारी 445 देशांतर्ग उड्डाणे झाली
नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी सांगितले की, देशात एका दिवसापूर्वी 445 देशांतर्गत उड्डाणे झाली. यातून 62 हजार 641 प्रवाशांनी प्रवास केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी बुधवारी 31 मे नंतर राज्यातील सर्व मंदीर, मशीद आणि चर्च उघडण्याची मंजुरी दिली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे परवानगी मागितली आहे.
महाराष्ट्र पोलिस विभागाने सांगितल्याप्रमाणे 24 तासात 75 पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. यासोबतच आतापर्यंत 1,964 अधिकारी आणि जवान संक्रमित झाले आहेत. यात 1,095 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 20 जणांचा मृत्यू झाला, 49 रिकव्हर झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.