आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभरात कोरोना संक्रमितांचा आकडा 11 हजार 909 झाला आहे. बुधवारी महाराष्ट्रात 117 तर गुजरातमध्ये 56 नवीन रुग्ण सापडले आहेत. यादरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांनी रुपाणी यांची भेट घेतली होती. रूपाणी यांच्या सचिवाने सांगितले की, सध्या मुख्यमंत्री सेल्फ आयसोलेशनमध्ये राहतील आणि घरातूनच काम सांभाळतील.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात कोरोना संक्रमणाबाबत 3 कॅटेगरी हॉटस्पॉट, नॉन हॉटस्पॉट आणि ग्रीन झोन तयार करण्यात आली आहे. मंगळवारी 170 जिल्ह्यांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. 207 जिल्ह्यात अध्याप हॉटस्पॉट नाही, या जिल्ह्यात संक्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील रुग्ण संख्यांच्या आधारे टेस्टीग कीट देण्यात येत आहे. सध्या 73 लाख टेस्टिंग किट खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सध्या 23 लाख टेस्टींग किट मिळाले आहेत.
दुसरीकडे, मध्यप्रदेशच्या इंदुरमध्ये 117, राजस्थान 29 आणि बंगालमध्ये 23 रुग्ण सापडले आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही महामारी पसरण्यास सुरुवात झाली आहे. येथील 13 जिल्ह्यांमध्ये 90 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे आकडे covid19india.org आणि देशातील सर्व राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आहेत.
आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी सांगितले की, 24 तासात देशभरात कोरोनाचे नवीन 1 हजार 76 केसेस समोर आल्या आहेत. यापूर्वी 13 एप्रिलला 1 हजार 242, 10 एप्रिलला 871 आणि 11 एप्रिलला 854 रुग्ण सापडले होते. आरोग्य मंत्रालय दररोज सकाळी आणि
संध्याकाळी मागील 24 तासांचे आकडे जारी करत आहे.
27 राज्य आणि 7 केंद्र शासित प्रदेशामध्ये पसरला कोरोना
कोरोना व्हायरस देशातील 27 राज्य आणि 7 केंद्र शासित प्रदेश (यूटी)मध्ये पसरला आहे. यात दिल्ली, चंडीगड, अंडमान-निकोबार, दादरा आणि नगर हवेली, जम्मू-काश्मीर, लद्दाख आणि पुडुचेरी सामील आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.