आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Virus India | Mumbai Delhi | Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:देशातील रुग्णांचा आकडा 2.90 लाख; स्पेनला मागे टाकत भारत बनला जगातील पाचवा कोरोना संक्रमित देश

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 2 लाख 90 हजार 481 झाला आहे. हे आकडे covid19india.org चे आहेत. भारत गुरुवारी रुग्णांच्या बाबतीत स्पेन (2.89 लाख) च्या पुढे गेला आहे. भारत आता जगातील पाचवा संक्रमित देश बनला आहे.

सध्या, टॉप-7 संक्रमित देशात अमेरिका, ब्राजील, रशिया, ब्रिटेन, भारत, स्पेन आणि इटली आहे. पण, रिकव्हरी रेटमध्ये भारत अमेरिकेपेक्षा चांगला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, भारतातील रिकव्हरी रेट 49.21%  आहे. तर, ब्राजील 51.14%, रशिया 51.97%, इटली 72% रिकव्हरी रेट आहे.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितले की, 'आता देशात संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या आहे. मागील एका महिन्यात रिकव्हरी रेट 11% वाढला. 18 मे रोजी 38.29% रिकव्हरी रेट होता. आज सकाळी 49.21% झाला आहे. आतापर्यंत देशात 1.41 लाखांपेक्षा जास्त रुग्णांना ठीक झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. ' आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 1 लाख 37 हजार 448 अॅक्टिव केस होते आणि एक लाख 41 हजार 29 रुग्ण ठीक झाले आहेत.

याप्रकारे जेव्हापासून लॉकडाउन सुरू झाला, तेव्हापासून संक्रमित रुग्णांसोबतच ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत गेली. लॉकडाउन 4 संपेपर्यंत 93 हजार 322 रुग्ण ठीक झाले होते. म्हणजेच, अनलॉक-1 मध्ये 47 हजार 707 रुग्ण ठीक झाले. दरम्यान, covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 2 लाख 87 हजार 754 कोरोना रुग्ण आहेत. बुधवारी पहिल्यांदा 11 हजार 156 पेक्षा जास्त रुग्ण मिळाले. 

बातम्या आणखी आहेत...