आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus India News And Update;Coronavirus Peak In India By Mid September; Expert Says It Depends On Public And Government Action

कोरोनावर जानकारांचा दावा:15 सप्टेंबरपर्यंत भारतात संक्रमण शिगेला पोहचेल, गावात संक्रमण पसरण्यापासून रोखणे गरजेचे

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात कोरोना व्हायरस 15 सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. व्हायरसवर आळा घालण्यासाठी आता नागरिकांनी आपली जबाबदारी समजायला हवी. देशातील एक तृतीशं लोकसंख्या गावात राहते, त्यामुळे संक्रमण गावात पसरण्यापासून रोखणे गरजेचे आहे. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट प्रो. के श्रीनाथ रेड्डी यांनी शनिवारी या संक्रमणाबाबत सतर्क केले.

राज्यात वेगवेगळ्या वेळी संक्रमण वाढेल

प्रो. रेड्‌डी म्हणाले की, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी कोरोना संसर्ग शिगेला पोहचेल. डॉ. रेड्डी ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसमध्ये कार्डियोलॉजी डिपार्टमेंटचे हेड होते. सध्या ते हार्वर्डमध्ये स्टडीसंबंधित काम करतात. ते म्हणाले की, संक्रमण गावा-गावात पसरण्यापासून रोखणे गरजेचे आहे. 

अनेक ठिकाणी चुका झाल्या

प्रो. रेड्डी म्हणाले की, लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यात आली, पण 3 मेनंतर लॉकडाउनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या. याकाळात सर्वे, टेस्टिंग, आयसोलेशन करण्याची गरज होती, ती केली नाही. लॉकडाउनमध्ये सवलत मिळताच नियमांचे पालन करण्यात आले नाही. 

बातम्या आणखी आहेत...