आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभरात एकूण 14 हजार 378 कोरोना संक्रमितांची पुष्टी झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. यातील 4 हजार 291 म्हणजेच 29.8% संक्रमित तबलिगी जमातीशी संबंधित आहे. जमातीच्या सदस्यांमुळे 23 राज्यांत कोरोनाचा संसर्ग वाढला. तमिळनाडूत 84%, दिल्लीत 63%, तेलंगाणात 79%, आंध्रप्रदेशात 61% आणि उत्तर प्रदेशातील 59% संक्रमित तबलिगी जमातीशी संबंधित किंवा त्यांच्या संपर्कात आले होते. सरकारनुसार, देशातील 47 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसांपासून कोणताही रुग्ण मिळाला नाही.
मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील संक्रमणामुळे मृत्यू दर 3.3 टक्के आहे. हा मृत्यू दर इतर कोणत्याही देशांपेक्षा खूपच कमी आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 83% वयोवृद्ध होते किंवा त्यांना इतर आजार होते. अग्रवाल यांनी सांगितले, अग्रवाल म्हणाले की 23 राज्यांतील 47 जिल्ह्यांमध्ये सकारात्मक ट्रेंड दिसून आला आहे. येथे मागील 28 दिवसांमध्ये संक्रमणाचे कोणतेही प्रकरण समोर आले नाही. याशिवाय 45 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर फक्त 3 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांनंतर नवीन केस समोर आल्या आहेत. हा एक लढा आहे, म्हणून आपल्याला दररोज स्वत: ला तयार करावे लागेल.
परदेशी नागरिकांचा व्हिसा कालावधी वाढवणार
गृह मंत्रालयाचे सहसचिव पी एस श्रीवास्तव म्हणाले की, सरकारने भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत 3 मे पर्यंत वाढवण्यात येणार आहे. परदेशी नागरिक यासाठी अर्ज करु शकतात. त्यांच्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. ते म्हणाले की, जर परदेशी नागरिकांना एक्झिट परमिटची गरज भासली असेल तर ते त्यासाठी 17 मे पर्यंत अर्ज करु शकतात. कोणताही नागरिक 1930 आणि 1944 नंबर डायर करून सरकारकडून मदत मागू शकतो.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी विनाकारण हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचे सेवन करू नये - आयसीएमआर
अग्रवाल म्हणाले की, रक्तदानावर लक्ष केंद्रित केले आहे जेणेकरुन गंभीर रूग्णांवर उपचार शक्य होतील. यासाठी रक्त संकलन केंद्रे उभारली जातील. गृह मंत्रालयाने सांगितले की, रविवारी 20 एप्रिलपासून लॉकडाऊनमधील सवलतीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. आयसीएमआरने म्हटले की, आरोग्य कर्मचाऱ्यांनी विनाकारण हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचे सेवन करू नये. अभ्यासातून असे दिसून आले आहे की 35 वर्षांखालील 10 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोटदुखीची तक्रार केली आहे. हायड्रॉक्साइक्लोरोक्वीन औषधाच्या दुष्परिणामावर संशोधन केले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.