आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 265 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 2,706 आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या 24 तासांत 1,209 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्हिटी रेट सुमारे 0.17% आणि रिकव्हरी रेट सुमारे 98.8% आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत 220.10 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 64 हजार 239 डोस देण्यात आले. यापूर्वी शनिवारी 226 नवीन रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. दुसरीकडे, शुक्रवारी 243 नवीन रुग्ण आढळले.
आत्तापर्यंतचे अपडेट्स वाचा...
पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला
XBB.1.5 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण शनिवारी गुजरातमध्ये आढळून आला. हे ओमायक्रॉनचे म्युटेशन आहे.
देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणामध्ये 900 डॉक्टर आणि 5000 स्टाफ नर्सची भरती करण्यात येणार आहे.
रविवारपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून चीनसारख्या 6 देशांतून भारतात येणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.