आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Virus India Update | Mumbai Delhi Coronavirus News | Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:आतापर्यंत 5.73 लाख प्रकरणे; देशातील लहान लहान जिल्ह्यांतही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे

नली दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसामची राजधानी गुवाहाटी येथे लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी अशाप्रकारे शिक्षा केली
  • देशात आतापर्यंत 16 हजार 904 मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक 7,610 रुग्णांचा बळी

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5 लाख 73 हजार 598 झाली आहे. covid19india.org नुसार, मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विविध राज्यांनी 6,062 नवीन रुग्ण सापडल्याची पुष्टी केली. याआधी सोमवारी 18 हजार 339 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि 13 हजार 497 रुग्ण बरे झाले. 

तमिळनाडूत संसर्ग वेगाने वाढत आहे. मागील 24 तासांत येथे विक्रमी 3949 रुग्ण वाढले. सलग पाचव्या दिवशी 3500 पेक्षा जास्त रुग्ण सापडले. देशातील सर्वाधिक संक्रमित राज्यांमध्ये तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. 

कोरोनाच्या व्हॅक्सीनेशनची तयारी

देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 5 लाख 68 हजार 315 झाली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना लसीच्या तयारीसाठी बैठक घेतली. यामध्ये भारत आणि जागतिक स्तरावर लस तयार होण्याच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली.  या दरम्यान त्यांनी कोविड विरूद्ध लसीकरण प्रयत्नांमध्ये भारताच्या जबाबदाऱ्यांचा पुनरुच्चार केला. लसीकरण अधिक चांगल्याप्रकारे आणि वेळेवर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासही मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितले. यासाठी त्यांनी तातडीने नियोजन करण्याचा आग्रह धरला.

कोरोना संक्रमण आता देशातील लहान लहान जिल्ह्यातही वाढत आहे. काही जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. यात महाराष्ट्रच्या सोलापूर आणि जळगावचा समावेश आहे. येथील मृत्यूदर मुंबई (4463 मृत्यू), अहमदाबाद (1432 मृत्यू), ठाणे (871 मृत्ये) आणि कोलकाता (372 मृत्यू) पेक्षा जास्त आहे. सोलापुरचा मृत्यूदर 9.75% आणि जळगावचा 6.90% आहे. तर, मुंबईचा 5.78% आहे.

तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवला

तमिळनाडू सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. चेन्नई आणि आसपासच्या परिसरात 5 जुलैपर्यंत कडक लॉकडाउन लागू असेल. तर, पुर्ण राज्यात जुलैच्या प्रत्येक रविवारी कडक लॉकडाउन असेल. तसेच, महाराष्ट्रातही लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. यापूर्वी पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये लॉकडाउन 31 जुलैपर्यंत आणि मणिपुरमध्ये 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.