• Home
 • National
 • Corona virus lockdown : Sonia Gandhi writes letter to PM Narendra Modi news and updates

कोरोना संदर्भात सोनिया गांधींचे पीएम मोदींना पत्र; कर्ज हफ्ते-ईएमआय पुढे ढकलण्यासह या केल्या मागण्या

 • काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पीएम मोदींच्या लॉकडाउनच्या निर्णयाचे केले स्वागत 

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 01:19:23 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. कोरोचा फैलाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाउनमुळे सामान्य लोकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या महामारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे आणि कोरोना व्हायरसबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोनिया गांधींनी लॉकडाउनचा निर्णय योग्य असल्याचे म्हणले आहे. सोबतच सामान्य कामगार पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी देखील केली आहे.

पीएम मोदींच्या निर्णयाचे सोनिया गांधीकडून स्वागत


पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधींनी लिहिले की, कोरोना व्हायरसचा धोका पाहता 21 दिवस लॉकडाउनचा निर्णय हा स्वागतार्ह पाऊल आहे. अशात प्रत्येकजण या संकटात देशाबरोबर उभा आहे. परंतु यासोबतच देशात आरोग्यासह अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही हे संकट मोठे आहे.


सोनिया गांधींनी आपल्या पत्रात काही मागण्या लिहून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आवाहन केले

 • 1. कोरोनाशी सामना करण्यासाठी सरकारने आरोग्य सेवांसाठी 15 हजार कोटी रुपये दिले आहेत. अशावेळी कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या डॉक्टरांना तत्काळ N95 मास्क आणि हॅजमॅट सूटची व्यवस्था करण्यात यावी.
 • 2. डॉक्टरांना जोखीम भत्ता जाहीर करावा. 1 मार्च ते पुढील 6 महिन्यांसाठी याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
 • 3. कोरोना संबंधीची संपूर्ण माहिती मिळण्यासाठी एका पोर्टल आणि फोन नंबरची व्यवस्था करावी. कोरोनावर उपचार होत असलेल्या देशातील सर्व रुग्णालयांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचावी.
 • 4. कोरोनाचे संकट पाहता सरकारने तात्पुरते रुग्णालयांची स्थापना करावी. यासोबत आयसीयू आणि व्हेंटिलेटरची तत्काळ व्यवस्था करावी.
 • 5. केंद्र सरकारने दररोज दैनंदिन वेतन कामगार, फॅक्टरी कामगार, मनरेगा कामगारांसह गोरगरीब लोकांना थेट आर्थिक मदत दिली पाहिजे. ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात गेली पाहिजे.
 • 6. सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचा MSP वाढवावा आणि कोणतीही रिकव्हरी पुढील सहा महिन्यांसाठी थांबवावी.
 • 7. केंद्र सरकारने तत्काळ न्याय सारखी योजना तातडीने राबवावी, जन धन खात्यामार्फत लोकांना 7500ची मदत दिली जावी.
 • 8. गरीब कुटुंबाला 10 किलो गहू द्यावे, पुढील 21 दिवस पाहता याची पुर्तता करणे आवश्यक आहे.
 • 9. नोकरी व्यवसायातील सर्व ईएमआय 6 महिन्यांसाठी पुढे ढकलव्या. याशिवाय कर्जाचे हफ्ते देखील थांबवायला हवे.
 • 10. उद्योगासाठी करमुक्तीसारख्या घोषणा व्हाव्यात. छोट्या व्यावसायिकांवर लवकरच भर देण्यात यावा.
X