आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Virus | Mumbai Delhi Coronavirus News | Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:बाधितांचा आकडा 77 हजार 331 वर; मागील 24 तासात सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सचे 56 जवान पॉझिटिव्ह आढळले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी दिल्लीशिवाय राजस्थानमध्ये 87, ओडिशामध्ये 101 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
  • देशात मंगळवारी 3610 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या, तर 141 जणांचा मृत्यू झाला

देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 77 हजार 331 झाली आहे. मागील 24 तासात सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सचे 56 जवान कोरोना संक्रमित आढळले. यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) चे 41, केंद्रीय रिजर्व पोलिस दल (सीआरपीएफ) चे 3 आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) चे 13 जवान आहेत. सीआयएसएफचे आतापर्यंत 109 जवान या व्हायरसने संक्रमित झाले आहेत.केंद्राने बुधवारी माहिती दिली की, भारतीय रेल् ने पूर्ण देशात आतापर्यंत  642 श्रमिक स्पेशल ट्रेन्स चालवल्या. यातून अंदाजे 7.90 लाख प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले.

24 तासात 1900 रुग्ण कोरोनामुक्त झाले

मंगळवारी 3610 जणांची रिपोर्ट पॉझिटिव आली. मागील 24 तासात देशात सर्वात जास्त 1900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी 10 मे रोजी 1669 रुग्ण ठीक होऊन घरी गेले होते.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 74 हजार 281 संक्रमित आहेत. 47 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरू असून 24 हजार 386 ठीक झाले आहेत, तर 2415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • झारखंडचे आरोग्य सचिव नितिन मदान कुलकर्णी यांनी बुधवारी सांगितले की, श्रमिक स्पेशल ट्रेनमधऊन सोमवारी रात्री रांचीला गेलेल्या एका व्यक्तीची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. यासोबतच राज्यातील संक्रमितांचा आकडा 173 झाला आहे.
  • शंघाई सहयोग संघटनेची बुधवार बैठक आहे. यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सामील होतील. यात मुख्यत्वे कोरोना व्हायरसशी सामना करण्याबाबत चर्चा होईल. ही बैठक व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे होईल.
  • एअर इंडियाच्या 1377 फ्लाइट बुधवारी कुआलालम्पुर, मलेशियावरुन मुंबईच्या छत्रपती शिवाजी इंटरनेशनल एअरपोर्टवर येतील. यात 225 प्रवासी आहेत.
  • देशातील कोरोना कम्युनिटी ट्रांसमिशन ओळखण्यासाठी 21 राज्यातील 69 जिल्ह्यांना निवडण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदनेनुसार या जिल्ह्यात अँटीबॉडीजची तपासणी केली जाईल. एका जिल्ह्यातील 10 क्लस्टर क्षेत्रातील प्रत्येक घरातून प्रत्येकी एका व्यक्तीचे सँपल घेतले जाईल.
बातम्या आणखी आहेत...