आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak : Dose To 2.19 Crore People Over The Age Of 45 In The First 6 Days In The Country; News And Live Updates

लसीची सल ऐका सरकार:तुमच्याच आकडेवारीवर तुम्ही विश्वास ठेवला तर...देशात पहिल्या 6 दिवसांत 45 वर्षांवरील 2.19 कोटी लोकांना डोस; 18 वर्षांवरील लोकांना पहिल्या 6 दिवसांत फक्त 11.81 लाख डोस

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 45+ साठी राज्यांना दीर्घ नियोजन करता येण्याइतपत लसी नाहीत...10 दिवसांत10 हजार लस केंद्रे घटली

देशात आता १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे, लसींचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकार वारंवार सागत आहे. सरकारी आकडेवारी मात्र विरोधाभासी आहे. १८ ते ४४ वर्षांच्या सर्वांसाठी लसीकरण मोहीम १ मेपासून सुरू झाली आहे. ६ मेपर्यंतचे आकडे सांगतात की सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत या वयोगटातील केवळ ११ लाख ८०,७९८ लोकांनाच लस मिळू शकली आहे. या वयोगटासाठी लसींची व्यवस्था राज्य सरकारांना करायची आहे. मात्र राज्य सरकारे लसींचा पुरेसा पुरवठा नसल्याचे कानीकपाळी ओरडून सांगत आहेत. अापण याची तुलना ४५+ च्या सर्व लोकांच्या लसीकरणाशी केली तर स्थिती आणखी स्पष्ट होते.

१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण खुले झाले होते. तेव्हा राज्यांकडे लसींचा खूप तुटवडा नव्हता. यामुळे कोणत्याही राज्यांकडून फारशा तक्रारी आल्या नव्हत्या. यामुळे रोज दिल्या जाणाऱ्या लसींची सरासरी ६ दिवसांतच १९ लाखांवरून ३६ लाखांवर पोहोचली होती. या ६ दिवसांत देशात देशभरात एकूण २.१९ कोटी डोस टोचण्यात आले. १६ जानेवारीनंतर याच ६ दिवसांत सर्वाधिक लसीकरण झाले. आता रोज दिल्या जाणाऱ्या लसींची सरासरी पुन्हा १९ लाखांवर आली आहे. धक्कादायक म्हणजे, १८ ते ४४ वर्षांच्या वयोगटात रोजच्या लसींची सरासरी फक्त १.९७ लाख आहे.

४५+ साठी राज्यांना दीर्घ नियोजन करता येण्याइतपत लसी नाहीत...१० दिवसांत १० हजार लस केंद्रे घटली
राज्य सरकारांचे म्हणणे आहे की, ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी केंद्र सरकार पुढील तीन दिवसांत दिल्या जाणाऱ्या लसींचा आकडा देते. माहिती दिल्याविना दूरवरच्या ग्रामीण भागांत लसीकरण केंद्रांचे नियोजन करणे शक्य नाही. लसीच्या तुटवड्यामुळे १० दिवसांत १० हजार लसीकरण केंद्रे घटवण्यात आली आहेत. ६ मेच्या आकडेवारीनुसार राज्यांना पुढील ३ दिवसांत २८ लाख डाेस िमळतील. तथापि, राज्यांकडे आधीच सुमारे ८९ लाख डोस उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या राज्यांत दररोज सरासरी लसीकरणाच्या हिशेबाने ४-५ दिवसांपुरतेच डोस शिल्ल्क आहेत. केंद्राने अाजवर एकूण ३४ कोटी ६० लाख डोसची ऑर्डर दिली आहे. त्यात १६ लाख डोसची ऑर्डर २८ एप्रिलची आहे.

वर्क फोर्सची स्थिती : पुद्दुचेरीत १८-४४ वयोगटात फक्त एकच डोस, चंदीगडसह ४ राज्यांत २-२
सध्या छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, जम्मू -काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातच १८-४४ वयोगटाला लस टोचण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...