आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात आढळले 41,576 नवे रुग्ण, 39,125 झाले बरे; 5 दिवसानंतर सक्रिय रुग्णसंख्येत वाढ

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 3.82 लाख लोकांवर उपचार सुरु आहे

देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 41 हजार 576 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 39 हजार 125 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 491 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 5 दिवसानंतर सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी 45 हजार नवीन प्रकरणे आढळून आले. तर दुसरीकडे, रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्येतदेखील 3 ऑगस्टपासून घट होत आहे.

देशातील सक्रिय रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. बुधवारी सक्रिय रुग्णसंख्येत 1 हजार 955 ने वाढ झाली. देशात सध्या 3.82 लाख लोकांवर उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे, केरळ राज्यातदेखील कोरोनाच्या नवीन प्रकरणांत वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 23 हजार 500 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये 116 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण आढळून आलेले नवीन रुग्ण : 41,576
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 41,576
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 491
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.20 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.12 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.29 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.82 लाख
बातम्या आणखी आहेत...