आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात आढळले 40,066 नवे प्रकरणे, 41,707 बरे तर 583 लोकांचा मृत्यू; गेल्या 7 दिवसात दुसऱ्यांदा 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळ आणि हिमाचलमध्ये परिस्थिती चिंताजनक

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात चढ-उतार सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासात 40 हजार 6 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 41 हजार 707 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 583 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 7 कोरोनाचे नवीन प्रकरणे 40 हजारांपेक्षा जास्त आले आहे.

कोरोनाच्या सक्रिय रुग्णात गुरुवारी 2 हजार 237 ने घट झाली. सध्या देशात 3.79 लाख लोकांवर उपचार सुरु आहे. हा आकडा गेल्या 144 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 23 मार्च रोजी 3.65 लाख सक्रिय रुग्ण होते.

केरळ आणि हिमाचलमध्ये परिस्थिती चिंताजनक
देशात केरळ आणि हिमाचल राज्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. गुरुवारी केरळात 21 हजार 445 कोरोनाबाधित आढळले. दरम्यान, 20 हजार 723 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढताना दिसत आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण आढळून आलेले नवीन रुग्ण : 40,006
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 41,707
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 583
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.20 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.12 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.29 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.79 लाख
बातम्या आणखी आहेत...