आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासात आढळले 30,818 नवे रुग्ण, 48,916 बरे तर 2,024 मृत्यू; सक्रिय प्रकरणात 20 हजार 126 ने घट

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 4.25 लाख लोकांवर उपचार सुरु आहे

देशातील कोरोना महामारीची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे. गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी देशात 30 हजार 818 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 48 हजार 916 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर 2 हजार 24 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मृतांचा आकड्यांमध्ये काल अचानकपणे वाढ झाली आहे. या आकडेवारीत मध्यप्रदेशातील 1 हजार 478 जुने प्रकरणे जोडण्यात आले आहे.

देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 20 हजार 126 ने घट झाली आहे. हा आकडा गेल्या 14 दिवसातील सर्वात जास्त असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 28 जून रोजी 20 हजार 872 ने घट झाली होती.

देशातील कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात आढळून आलेले एकूण नवीन रुग्ण : 30,818
  • मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 30,818
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 2,024
  • आतापर्यंत संक्रमित झालेले रुग्ण 3.09 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 3 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.10 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.25 लाख
बातम्या आणखी आहेत...