आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:एका दिवसात आढळले 41,755 नवे रुग्ण, 39,289 बरे झाले; गेल्या 7 दिवसात उपचार घेणाऱ्यांपेक्षा नवीन रुग्णात वाढ

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळ राज्यात सर्वात जास्त 15 हजार 637 नवे रुग्ण आढळले

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत म्हणजे बुधवारी देशात 41 हजार 755 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 39 हजार 289 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 578 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 7 दिवसानंतर कोरोनाचे नवीन प्रकरणे उपचार घेणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त झाले आहे.

यापुर्वी 7 जुलै रोजी 45 हजार 701 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. यामध्ये 44 हजार 529 लोक उपचार घेत बरे झाले होते. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीत 1 हजार 875 ने वाढ झाली आहे.

केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण
देशातील सर्वात जास्त रुग्ण केरळ राज्यात आढळले आहे. केरळमध्ये एका दिवसांत 15 हजार 637 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा गेल्या 35 दिवसांतील सर्वात जास्त आहे. यापूर्वी 9 जून रोजी 16 हजार 204 प्रकरणे आढळले होते. येथे सक्रिय रुग्णांच्या संख्येत 2 हजार 535 ने वाढ झाली आहे.

देशातील कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात आढळून आलेले एकूण नवीन रुग्ण : 41,755
  • मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 39,289
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 578
  • आतापर्यंत संक्रमित झालेले रुग्ण 3.09 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 3.01 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.12 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.26 लाख
बातम्या आणखी आहेत...