आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात आढळले 24,692 नवे रुग्ण, 36,862 बरे झाले; नवीन प्रकरणे 153 दिवसात सर्वात कमी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा घट होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात 24 हजार 692 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 36 हजार 862 लोक उपचार घेत बरे झाले तर 438 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हा आकडा दिलासादायक असून गेल्या 153 दिवसातील सर्वात कमी आहे.

यापूर्वी 15 मार्च रोजी 24 हजार 437 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यासोबतच सक्रिय रुग्णसंख्येतदेखील दिवसेंदिवस घट होत आहे. सोमवारी देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 12 हजार 610 ने घट झाली. देशात आजघडीला 3.63 लाख रुग्णांवर उपचार सुरु आहे.

केरळ राज्यात गेल्या 24 तासात 12,294 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यात 26 जुलैनंतर एवढी कमी रुग्ण संख्या पाहायला मिळाली.

देशातील कोरोनाची आकडेवारी

गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे: 24,692 गेल्या 24 तासांत एकूण बरे: 36,862 गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू: 438 आतापर्यंत एकूण संक्रमित: 3.22 कोटी आतापर्यंत बरे: 3.14 कोटी आतापर्यंत एकूण मृत्यू: 4.32 लाख सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या: 3.63 लाख

बातम्या आणखी आहेत...