आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासात आढळले 35,197 नवीन प्रकरणे, एका दिवसात 10 हजारने वाढ; सलग चौथ्या दिवशी सक्रिय प्रकरणांमध्ये घट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 3.61 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणांत दिवसेंदिवस चढउतार होत आहे. मंगळवारी यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. देशात गेल्या 24 तासात 35 हजार 197 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे सोमवारी देशात 24 हजार 692 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. दरम्यान, एका दिवसात 37 हजार 136 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 440 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

यासोबतच सक्रिय रुग्णांतदेखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत एका दिवसात 2 हजार 398 ने घट झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात सलग चौथ्या दिवशीही सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे. देशात सध्या 3.61 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 35,197
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 37,136
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 440
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.22 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 3.14 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.32 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 3.61 लाख
बातम्या आणखी आहेत...