आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासात आढळले 36,592 नवे रुग्ण, 543 मृत्यू; एका आठवड्यानंतर मृतांची संख्या इतकी जास्त

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो राजस्थानमधील अजमेरचा आहे. येथे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांना कोरोनाची लस देत आहेत. - Divya Marathi
हा फोटो राजस्थानमधील अजमेरचा आहे. येथे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांना कोरोनाची लस देत आहेत.
  • देशात आजघडीला 3.57 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात दिवसेंदिवस चढ-उतार होत आहे. देशात गेल्या 24 तासात 36 हजार 592 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 36 हजार 451 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 543 लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे एका आठवड्यानंतर मृतांच्या आकड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे मागील 6 दिवसापासून सक्रिय रुग्णात सतत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गुरुवारी सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 408 ने घट झाली.

देशात आजघडीला 3.57 लाख लोकांवर उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे केरळ राज्यातही कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे चिंताजनक परिस्थिती आहे. राज्यात एका दिवसात 21 हजार 116 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून यामध्ये 197 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 19 हजार 296 लोक उपचार घेत बरे झाले आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 36,592
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 36,451
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 543
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.23 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 3.15 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.33 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 3.57 लाख
बातम्या आणखी आहेत...